•जय सहकारमध्ये’ विजय ‘….एन्ट्री होताच ग्रामीण भागात विजयी बोलबाला…..
•शेतकरी सभासदांचा कल विकासाच्या दृष्टीने ‘जय सहकार पॅनलकडे…..’
अजय कंडेवार,वणी :- 6 नोव्हेबर 2022 रोजी होणाऱ्या वसंत जिनिंगच्या निवडणुकी निमित्ताने शहरातील राजकीय वातावरण तापत असून सर्व पक्षाच्या उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेणे सुरू केल्या आहेत. सर्वत्र उमेदवारांची घरोघरी गर्दी दिसत असून प्रचाराच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या फेरिला अत्यंत आनंददायी सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येतं आहे. विशेष म्हणजे ‘ या निवडणुकीत ‘विजय चोरडिया ‘ यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे समजते कारण वणीतील ‘दानी व्यक्तीने’ एन्ट्री करताच आनंदाचे वातारणही या निवडणुकवारे यात दिसुन येत आहे.
वसंत जीनिंगच्या निवडणुकीत चौरंगी लढत होत असल्याने 17 संचालकासाठी 65 उमेदवारांची गर्दी झाली आहे. सर्व उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर देत आहेत. परिणामी, सध्या शहरात व ग्रामीण भागात सगळीकडे उमेदवारांच्या प्रचाराचा बोलबाला दिसत आहेत.
वसंत जिनिंगचा निवडणुक प्रचाराच्या रणधुमाळीचा वेग वाढला आहे. . कमीतकमी वेळात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व उमेदवार आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. या कालावधीत मात्र मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतू जय सहकार पॅनलचे सर्व उमेदवार हे मतदारांचा दारात तर सोडाच त्यांचा मनात वास केल्याची खमंग चर्चाही आता पासुनच यायला सुरूवात झाली आहे .
तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. यापैकी काही गावे व वाड्यावस्त्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने पायपीट करीत मतदारांपर्यंत जावे लागत आहे. परिणामी उमेदवार व कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे.
अनेक गावात जाण्यासाठी अरुंद रस्ते आहेत. संपर्क साधण्यासाठी परिसरात मोबाईलला रेंज नाही. त्यामुळे मतदारांपर्यंत जाता यावे, यासाठी उमेदवार व समर्थक सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.आज संस्थेची वणी, मारेगाव, मुकुटबन, शिंदोला, मार्डी, कायर, घोंसा, या ठिकाणी जिनिंग प्रेसिंग फक्ट्री व कृषी केंद्र कार्यरत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी सभासदांचा कल विकासाच्या दृष्टीने राहील असे मतदारात जय सहकार पॅनलचा बोलबाला आहे.