माणिक कांबळे /मारेगाव:- निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना उत्पनाचे दाखले बंधनकारक करण्यात आले आहे या जाचक अटीतून निराधाराना मुक्त करावे अशा आशयाची मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका शाखा मारेगावच्या वतीने तहसीलदार मारेगाव यांना सादर करण्यात आले आहे.30जून पर्यंत हयात दाखल्यां सोबत उत्पनाचे दाखले सादर करणे बंधनकारक करण्यात आल्यामुळे आयुष्याच्या शेवटचे दिवस मोजणाऱ्या निराधारानां कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.गेल्या काही दिवसापासून उत्पन्नाच्या दाखल्यासाठी निराधाराना उठबशा कराव्या लागत असून त्यांना आगाऊ आर्थिक भ्रूदंड सहन करावा लागत आहे.जगण्याचा आधार नसणाऱ्या निराधाराकडे कुठलेच उत्पन्नाचे साधन नाही त्यामुळे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यांची मागणी करणे गैरसोयीचे आहे. वृद्धापकाळातील ही गैरसोय टाळण्यासाठी शासन आपल्या दारी या योजनेअरतर्ग माहिती उपलब्ध करून घ्यावी अन्यथा येत्या 1 जुलैला मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या जन्मदिनी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, शेख नबी, अनता जुमळे, आदित्य बुचे, सूरज नागोसे, प्रतिभा तातेड, सिंधु बेसेकर, संगीता सोनुले, बेबी आत्राम, यांचे सह अनेकांच्या सह्या आहेत.