Ajay kandewar,Wani : शहरात आणि परिसरात “नाम आहे पी. आय .गोपाल उंबरकर… बच के रहना रे बाबा!” असे भयप्रद वाक्य लोकांच्या तोंडी उच्चारले जाऊ लागले आहे. समाजात भीतीचे वातावरण निर्माण करून स्वतःची दहशत वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या टोळीवादी प्रवृत्तींना आता पोलिसांनी आळा घालण्याचा निर्धार केला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे एकच की,कुख्यात सराईत गुन्हेगार अमोल उर्फ भुऱ्या विजय ठाकरे (31) हा चिखलगाव येथील रामनगर परिसरात वास्तव्यास आहे. याला वणी पोलिसांनी दणका देत M.P.D.A. अंतर्गत स्थानबद्ध केले. यवतमाळ जिल्हादंडाधिकारी यांचे आदेशाने त्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृह नागपूर, जिल्हा नागपूर येथे दाखल करण्याची प्रकीया सूरू आहे.गुन्हेगारीच्या रस्त्यावर बचाव करण्याऐवजी “वचक” निर्माण करण्याचे काम सध्या पोलीस यंत्रणा करताना दिसत आहे. म्हणजेच गुन्हेगारांना उघडपणे वावरण्याची सवय मोडून, त्यांच्यावर कायद्याचा अंकुश घट्ट बसविण्यासाठी “नो टॉलरन्स”ची भूमिका उचलण्यात आली आहे.

• पोलिसांचे सापळे, टोळींचे पाय हादरले
अलीकडील काळात खंडणी, दहशत, मारामाऱ्या आणि अवैध धंद्यांच्या सावटामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. मात्र वणी पोलिस ठाण्याने विशेष मोहीम उभी करत अशा टोळीवाद्यांवर सलग कारवाई सुरू केली आहे. “गुन्हेगारांना वाचवायचं नाही, समाजाला वाचवायचं आहे” या धोरणावर भर दिला जातोय.
•जनतेत विश्वास – गुन्हेगारांत धास्ती
“पोलीस फक्त दाखवतात, पण करीत नाहीत” असा जो एक समज नागरिकांत होता, त्याला धक्का बसू लागला आहे. सलग छापे, अटक आणि कठोर तपासामुळे सामान्य माणसात आत्मविश्वास तर वाढला आहेच, पण गुन्हेगारी जगतात “बच के रहना” ही जाणीव पक्की होत चालली आहे
.

