•कायर परिसरात लपंडाव सुरूच, उपाययोजना शून्य.
अजय कंडेवार,वणी:- गेल्या काही दिवसांपासून कायर परिसरात कोणत्या ना कोणत्या कारणाने वारंवार वीजपुरवठा खंडित होतो आहे.उन्हाळा असल्याने तापमानात दिवसेंदिवस वाढ हाेत असल्याने वारंवार खंडित हाेत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. तसेच वारंवार वीजपुरवठा काहीही कामासाठी खंडित केला जाताे.The citizens are suffering and the newly appointed village administrator is also lazy.
ऊन्हाच्या तीव्र उकाड्याने मनुष्य प्राणी सद्यस्थितीत भयंकर त्रस्त असून, त्यात अजून एक भर म्हणजे कायर गावात सततचा होणारा वीजेचा लपंडाव. तिला वेळच नाही, कोणत्याही वेळी, दिवसा- रात्री, कोणत्याही वेळेस, मनमानी दहा मिनिटांसाठी वीज जाते, दहा मिनिटानंतर येते. पुन्हा एक दोन तासांनी झालेली दहा मिनिटांसाठी जाते पुन्हा येते. असा विजेचा सतत नित्यक्रमचं चाललाय गावात. गेल्या कित्येक दिवसापासून या विजेच्या लपंडावाचा कायरकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यास जबाबदार कोण? महावितरणने वेळेवर विजेचे मेंटेनन्स व्यवस्थित केले असते तर? कदाचित हा त्रास वीज ग्राहकांना सहन करावा लागला नसता. म्हणूनच तर विजेचा लपंडाव हा वाढलेला दिसत आहे. परंतू गाव प्रशासन यावर काय उपाययोजना करत आहे याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. कारण गावकऱ्यांचा वाली म्हणजे गावकारभारीच असतात. म्हणून नवनियुक्त गावगाडा हाकणारे हे गावकऱ्याना मूलभूत गरजा व त्यावर उपाययोजना करणे महत्वाचे आहे. परंतू या कायर गावची महत्वाची समस्या म्हणजे विजेचा लपडाव…. याकडे महावितरण तर भोंगळच कारभार दिसत आहे परंतू गावप्रशासन लक्ष देतील की दुर्लक्ष करतील येणारा काळच सांगेल परंतू हाल मात्र नागरिकांचेच होत आहे हे सत्य.
अजून तर पावसाळ्याला सुरुवात नसून, पावसाळ्यात काय होईल देवच जाणे. थोडसं वारा आला, थोडासा पाऊस सुरू झाला की, लाईटचा त्रास होणार हे सद्यस्थितीहून लक्षात येत आहे. भेटेल. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात कायर मुकुटबन महावितरण यशस्वी होणार का ? ग्राहकाने इमानदारीने महिन्याचे वीज कायरकरानी बिल भरून सुद्धा, त्याला या विजेच्या लपंडावाचा नाहक त्रास सहन करावा लागणार का ? मुकुटबन महावितरणचे अधिकारी सदर प्रकरणास गांभीर्याने घेण्यासाठी तयार होतानाही दिसत नाही. साध्या महावितरनाला ताळावर न आणणारे गावगाडा हाकणाऱ्याचा हाती गाव कारभार दिला तरीही अपयशाचा आलेखच हाती म्हणावे लागेल. आता गाव प्रशासन फक्त खुर्च्यांवर बसण्याकरीता की निवडून देणाऱ्या जनतेचे प्रश्न सोडविण्याककरीता अशी गंभीर चर्चाही गावात सुरू आहे. नाम के लिये ही हैं भाई अशीही दयनीय अवस्था गावची होताना दिसत आहे.