Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsनवरात्रौत्सवात मांसविक्री प्रतिष्ठाने 10 दिवस बंद ठेवा .

नवरात्रौत्सवात मांसविक्री प्रतिष्ठाने 10 दिवस बंद ठेवा .

•प्रशासनाने व्यावसायिकांना पत्रक द्या,युवासेनेची मागणी.

Ajay kandewar,Wani : 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रौत्सवानिमित्त वणी विधानसभा क्षेत्रातील (वणी, झरी, मारेगाव) मटण, चिकन व मच्छी मार्केट 10 दिवसांसाठी बंद ठेवण्यासाठी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वाखाली मागणी निवेदन देण्यात आले.

नवरात्र हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण असून, माता दुर्गेची भक्तिभावाने पूजा-अर्चा करण्यासाठी लाखो भक्त उपवास व व्रत करतात. अशा काळात मांसविक्रीमुळे भक्तांच्या धार्मिक भावनांना धक्का पोहोचतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने व्यावसायिकांना पत्रक देऊन सर्व प्रतिष्ठाने 10 दिवस बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी नम्र पण आग्रही विनंती करण्यात आली आहे.

यावेळी सांगण्यात आले की, नवरात्रोत्सव हा सामाजिक सौहार्द, भक्तीभाव आणि एकतेचा संदेश देणारा सण आहे. त्यामुळे या दिवसांत कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत. यासाठी प्रशासनाने उघड्यावर मांसविक्री करणाऱ्या दुकानांवरही तातडीने कारवाई करावी आणि सामाजिक वातावरण शांततेचे व श्रद्धेचे राहावे, यासाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.याप्रसंगी अजय चन्ने, कुंदन पेंदोर, राहुल कोलते, साकेत भुजबलराव, तुषार काकडे, निखिल मडावी, सोनू नरड, मनोज वाकटी, गौरव पांडे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments