Ajay Kandewar,Wani assembly pole:- राज्यात निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी बघायला मिळाली. यात वणी मतदारसंघात महाविकास आघाडी कडून संजय देरकर यांना संधी देण्यात आली होती. परंतु याठिकाणी काँग्रेसचे संजय खाडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला आहे. महायुती विद्यमान आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे याठिकाणी होणारी लढत अतिशय तगडी होण्याची शक्यता आहे.
सुरूवातीपासून वणी मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला होता. याठिकाणी कोंग्रेसचे संजय खाडे यांनी दंड थोपटत आमदारकी लढण्याचा इशारा दिला. यासाठी त्यांना काँग्रेस हायकमांडशी ही भेट घेतली. मात्र वरिष्ठांनी संजय देरकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे याठिकाणी संजय विरुद्ध संजय यांच्यात लढत होणार आहे. मात्र संजय खाडे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत मोठा ट्विस्ट च निर्माण केला आहे.
लोकसभा निवडणुकीत खाडे यांनी खा.धानोरकर यांच्यासाठी जोमात प्रचार केला होता. मात्र त्यांना यश ही आले. त्यामुळे या लोकसभेचा निवडणुकीचा अनुभव बघता त्यांनी वणी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. त्यात त्यांना जनता साथ देईल त्यात शंका नाहीं कारण मनसे चें राजू उंबरकर यांना अनेकदा मतदारांनी मते दिले, संजय देरकर यांनाही मते दिली. माञ आजगत संजय खाडे यांच्यासारखा शांत स्वभाव, ग्राउंड लेव्हल ने काम करणारा नेता जनतेच्या कामासाठी पहिल्यांदाच सज्ज झाल्याने जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहे. त्यांचावर एक नवीन आशेचे किरण म्हणुन जनतेचे लक्ष लागले आहे. “एक चान्स.. अबकी बार संजय खाडे को” म्हणत जनता त्याकडे पाहत आहे.