•या बरसलेल्या पावसाने अनेकांची बियाणे अंकुरली
माणिक कांबळे /मारेगाव:- अधून मधून बरसणाऱ्या पावसा नंतर काल धुव्वाधार पावसाची बॅटिंग झाली. गेल्या तीन दिवसापासून पाऊस सुरु झालाआहे हा पाऊस पेरलेल्या बियानाला पोषक ठरला आहे. अनेकांची बियाणे अंकुरली असून काहींना मात्र दोन दिवसात उगवेल अशी अशा लागली आहे.26जून ला 4:30वाजता धुव्वाधार पावसाने सुरुवात केली जवळपास अर्धा तास हा पाऊस बरसला. तर 27 जूनला रिमझिम सुरुच.
त्यामुळे उकाळा पूर्णतः क्षमला असून वातावरणात बदल झाला आहे. या पावसाने शेतकऱ्यांनी टोबनी केलेल्या बियाणाला अंकुरण्यासाठी योग्य वातावरण निर्माण झाले असल्यामुळे सुटकेचा श्वास सोडला आहे. दोन दिवसाच्या रात्रभर पावसाची रिमझिम सुरु होती. थोडया विश्रांती नंतर लगेच रिमझिम सुरूच झाली.या सर्व वातावरणामुळे शेतकऱ्यां मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन दिवसापूर्वी पेरलेली बियाणे करपेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्या नंतर दोन दिवसात या बरसलेल्या पावसाने अनेकांची बियाणे अंकुरली आहे.काही शेतकऱ्यांनी धुळपेरणी केली होती. तर काहींनी दोन दिवसापूर्वी पेरणी केली आहे. मात्र पाऊस दडी मारेल की काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत असताना अचानक पावसाच्या धुव्वाधार सरी बरसल्या त्यामुळे शेतकऱ्यां मध्ये समाधानाचे वातावरण आहे.