• उमेश पोद्दार यांना पितृशोक.
अजय कंडेवार,वणी:- उमेश पोद्दार यांचे वडील धुलीचंद चिरंजीलाल पोद्दार (वय 85) यांचे आज 6 मार्च दुपारी 12 वाजताचा दरम्यान दीर्घ आजाराने निधन झाले.
धुलीचंद चिरंजीलाल पोद्दार यांची 3 मार्च 2023 शुक्रवार रोजी त्यांची प्रकृती अतिशय गंभीररित्या ढासळल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नागपूरला हलविण्यात आले होते. मागील काही दिवसापासून त्यांच्यावर तेथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ते अतिदक्षता (I.C.U) विभागातच दाखल होते. आज त्यांचे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही आज रुग्णालयात उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुले, सुन, नातवंडे असा आप्त परिवार आहे. त्यांचा जाण्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांच्यावर आज सोमवार दि.6 मार्च रोजी सायंकाळी 3 वाजता वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.