•वणी येथील घटना
अजय कंडेवार,वणी:- धारदार शस्त्र (तलवार) अवैधरित्या बाळगणा-या दोन युवकांना Two arrested for carrying sharp weapons by L.C.B स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने अटक केली आहे . आरोपींचे नाव रोहीत राकेश खरे (वय ,20 वर्ष), व अयान मनसुरी शक्कत अली (वय,19 वर्षे) दोन्ही राहणार रंगनाथ नगर, खरबड़ा मोहल्ला वणी येथील आहे. पथकाने त्याच्याकडून धारदार शस्त्र (दोन तलवारी) जप्त केली आहे.
शहरातील रंगनाथ नगर, खरबड़ा मोहल्ला येथील युवकाकडे धारदार शस्त्र (तलवार) अवैधरित्या घातकशस्त्र बाळगत असल्याची माहिती L.C.B चमूला मिळाली होती. ही माहिती मिळताच पथकाने काल दि.10 सायंकाळीं 7 वाजताचा सुमारास दरम्यान त्याठिकाणी जाऊन आरोपीला शिताफीने अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून 2 धारदार तलवार जप्त करण्यात आला व पोलिसांनी खाकी दाखविताच कुणाकडून घेतली त्याबद्दलही माहिती दिली.
या दोन्ही युवकांवर कलम 4/25 शस्त्र कायदा सहकलम महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई वरिष्ट अधिकारी यांचे मार्गदर्शनात सपोनि अमोल मुंडे, सुनिल खंडागळे,सुधिर पिदुरकर, सुधिर पांडे, रजनिकांत मडावी,नरेश राऊत हे सर्व L.C.B पथक यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.