•शिरपूर पोलिसांना यश, आरोपींना 2 दिवसांचा PCR.
•शिरपूर ठाणेदार गजानन करेवाड यांचा हाती लागला मुख्य सूत्रधार
अजय कंडेवार, वणी:- चक्क आलिशान कारने होणारी सुगंधित तंबाखूची तस्करी २५ जुलै रोजी LCB ने उघडकीस आणली. पांढरकवडा तालुक्यातील आभई फाटा वाय पॉईंटवर नाकेबंदी करून या वाहनातून लाखोंचा सुगंधित तंबाखू व इतर असा एकूण आठ लाख ४७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.”That…” Gutkha smuggler “Bhai” worth 8 lakhs was caught..Yash to Shirpur police, 2 days PCR for accused.
गुन्हे शाखेचे पथक मंगळवारी वणी पोलिसांच्या हद्दीत पेट्रोलिंगवर होते. दरम्यान, खबऱ्याकडून सुगंधित तंबाखूच्या तस्करीची टिप मिळाली होती.एमएच ३४ एएम २५२० या क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या वाहनातून हा तंबाखू ढाकोरीबोरीकडून शिरपूरकडे येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावरून गुन्हे शाखेच्या वणी, पांढरकवडा विभाग पथकाने आभई फाटा वाय पॉईन्टवर नाकेबंदी केली. दरम्यान, गोपनीय माहितीप्रमाणे सदर क्रमांकाचे वाहन पथकातील अधिकाऱ्यांना दिसले. हे वाहन अडवून चालकाला ताब्यात घेतले असता त्याला माहिती विचारली असता, उडवाउडवीचे उत्तरे दिली आणि शेवटी L.C.B पथकाला त्याचा कारमधून सुगंधित तंबाखू व इतर असा एकूण आठ लाख ४७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.२६ जुलैला अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दंदे यांच्या फिर्यादीवरून प्रवीण गोहकार ( ३९ ) याच्याविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात भांदविसह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ नियम व नियमने २०११ च्या विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते.
आता समोरील तपास शिरपूर ठाणेदार गजानन करेवाड यांचकडे आले. त्यांनी हा तपास हाती घेताच तपासाचे चक्रे फिरविले व अवघ्या काही तासातच “त्या प्रवीण ने “संपूर्ण माहीती सांगितली व त्या प्रवीण ला गुटखा सप्लाय करणारा मुख्य सुत्रधार मो. मकसुद मो. मंसूर पारेख वय (४०) रा. कोरपना याला शिरपूर पोलीसांनी अटक केली . या गुन्हातील प्रवीण गोहकार ( ३९ ) व मुख्य सुत्रधार मो. मकसुद मो. मंसूर पारेख या दोघांना 2 दिवसांचा पी. सी .आर घेण्यात आला आहे. पुढील तपास गुन्ह्याचा तपास कार्यात अग्रेसर समजले जाणारे शिरपूर ठाणेदार गजानन करेवाड करीत आहे.