Ajay, Wani : मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत चर्चेत असलेल्या कथित मटका व झेंडीमुंडीच्या व्यवसायाला आता नवे वळण मिळाले आहे. कथित ‘नू**र’ नावाने चर्चेत असलेला कथित धंदा तात्पुरता बंद करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, यामुळे मूळ प्रश्न संपलेला नाही. उलट, मुकुटबन परिसरात चर्चेत असलेल्या तीन-तीन कथित धंद्यांचा वाली-दलाल कोण? त्यांच्याकडून “ऊसुली “कोण करतो? आणि लाखोंच्या कथित उलाढाल अखेर कोणत्या गेंडूरगिटक्याचा घशात जातो? हे प्रश्न अधिक महत्वाचा झाला आहे.
मटका आणि झेंडीमुंडीचा व्यवसाय बेकायदेशीर असल्यास त्याला कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी असण्याचा प्रश्नच येत नाही. मग तीन ठिकाणी असे कथित व्यवसाय सुरू असल्याची चर्चा इतके दिवस कशी सुरू राहिली? त्यामागे कोणाचा वरदहस्त होता का? कोणाकडून कोणतीही रक्कम घेतली जात होती का? ‘वसुली’च्या चर्चेत असलेला पैसा नेमका कोणापर्यंत पोहोचत होता? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने तपासातून स्पष्ट करणे आवश्यक आहे.
धंदा तात्पुरता बंद म्हणजे प्रश्न संपला का?
कथित ‘नू***र’चा कथित धंदा सध्या तात्पुरता बंद असल्याची चर्चा असली, तरी नागरिकांच्या मनातील प्रश्न कायम आहेत. एखादा कथित व्यवसाय काही काळासाठी बंद झाला म्हणजे संपूर्ण प्रकरणावर पडदा पडत नाही. तीन कथित धंदे सुरू असल्याची चर्चा होती, तर त्यांची माहिती कोणाला होती? त्यावर नियंत्रण कोणाचे होते?आणि लाखोंची आर्थिक व्यवहाराची चर्चा असेल तर त्याची चौकशी झाली का?म्हणूनच आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तीन कथित धंदे, त्यांची आर्थिक उलाढाल, ऊसुलीच्या चर्चेचा स्रोत आणि संबंधितांचे संबंध याची निष्पक्ष चौकशी करावी, अशी जोरदार मौखिक मागणी होत आहे.

