Tuesday, November 10, 2026
HomeBreakingत्या गेंडूरगिटक्या... 'अभ्या'ला 'अभय' कुणाचे?

त्या गेंडूरगिटक्या… ‘अभ्या’ला ‘अभय’ कुणाचे?

Ajay Kandewar,Wani :- शहरात स्व. राम शेवाळकर नाट्यगृहाच्या बांधकामादरम्यान संबंधित ठेकेदाराने नगरपरिषदेच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीवरून जोडणी घेऊन बांधकामासाठी पाण्याचा वापर केल्याची तक्रार नगरसेवकांनी केली होती. ही जोडणी अधिकृत होती की अनधिकृत, याची चौकशी करण्याची मागणीही लेखी स्वरूपात करण्यात आली. मात्र, तक्रार करूनही आजपर्यंत ठोस कारवाई झालेली नाही. शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असताना सार्वजनिक जलवाहिनीचे पाणी बांधकामासाठी वापरल्याच्या तक्रारीला प्रशासनाने गांभीर्याने घेतलेले दिसत नाही.

संबंधित ठेकेदाराच्या कामकाजाबाबत वारंवार तक्रारी होत असतानाही त्या गेंडूरगिटक्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला वाचवण्याचा प्रयत्न का करीत आहेत? नगरसेवकांच्या लेखी तक्रारीची दखल घेतली जात नसेल, तर प्रशासनात ठेकेदाराचीच चलती आहे का? बाहेरून येऊन शहरात काम करायचे, मनमानी पद्धतीने कारभार करायचा आणि तक्रारी झाल्यानंतरही कारवाईपासून दूर राहायचे, असा प्रकार सुरू असेल तर याला जबाबदार कोण? ठेकेदाराच्या मनमानीला अधिकाऱ्यांचे अभय आहे की नगरपरिषद प्रशासनावर ठेकेदारशाहीचा दबाव आहे, हे आता स्पष्ट झाले पाहिजे.

नगरपरिषद ही ठेकेदारांच्या मर्जीने चालते की कायद्याच्या चौकटीत? नगरसेवकांनी लेखी तक्रार करूनही कारवाई होत नसेल, तर अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. संबंधित ठेकेदाराची चौकशी करून मुख्य जलवाहिनीवरील जोडणीचा परवानगी आदेश, पाणी वापराचे शुल्क आणि नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान यांचा हिशेब जाहीर करावा. अन्यथा ‘अभ्या’ला नेमके कुणाचे अभय आहे, हा प्रश्न कायमच असणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page