•नवनवीन तर्क-वितर्क शहरात सुरू, अद्यापही गुलदस्त्यात
अजय कंडेवार,वणी :- शहरातील 21 वर्षीय तरुण व्यावसायिकाची दुकानातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी सकाळी ७ वाजताचा दरम्यान धक्कादायक बाब समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.A young businessman ended his journey by hanging himself. New arguments in the city, still in the bouquet
सविस्तर वृत्त असे की,रोशन दिगांबर बावणे (२१) रा. लालगुडा असे मृतकाचे नाव आहे.शहरातील जत्रा मैदान परिसरातील हनुमान मंदीर समोर रोशन बावणे याचे फर्निचरचे दुकान आहे. फर्निचरचे साहित्य असल्याने रोशन दुकानातच रात्री झोपत होता असायचा. काल मंगळवारी रात्री देखील मृतक दुकानातच झोपला होता तर बुधवारी सकाळीं रोशन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती रोशनच्या वडिलाला देण्यात आली असता परिवारातील सदस्यांसह परिसरातील लोकांनी एकच गर्दी केली.या घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला . पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.