माणिक कांबळे/ मारेगाव :- शहरातील एका खाजगी हॉस्पिटलच्या बाजूला एका युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.The body of the young man was found.
पंजाब आत्राम अर्जुनी असे मृतकाचे नाव आहे. ही घटना दि 22 ला गुरुवारला दुपारी 3 वाजताचे सुमारास उघडकीस आली. मारेगाव शहरातून गेलेल्या राज्य महामार्गा वरील एका हास्पिटलच्या बाजूला हा युवक पडून असल्याचे निदर्शनास आले होते.प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा तो मृत पावल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले.हा युवक मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील पंजाब आत्राम (40)असल्याचे लक्षात आले.नेमका मृत्यू कशामुळे झाला कळू शकले नाही . याबाबत मारेगाव पोलीसांचे तपास सुरू आहे.