•शालेय विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन शिबिर
अजय कंडेवार,वणी: तालुक्यातील राष्ट्रीय विद्यालय,राजूर तसेच अनु.जाती जमाती मुलांची शासकीय निवासी शाळा,परसोडा येथे पुणे येथील एनिस करिअर अकॅडमी चे मार्गदर्शक सुनील सर व जॉयनल मंडल यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करून लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांना श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय विद्यालयचे मुख्याध्यापक श्री. धानोरकर सर तसेच अनु.जाती जमाती निवासी शाळा,परसोडा चे मुख्याध्यापक ठमके व कार्यक्रमाचे संयोजक महेश लिपटे प्रामुख्याने उपस्थित होते .मुर्धोनी गावचे सुपुत्र कॅप्टन कर्नल वासुदेव आवारी यांचे सैनिकी शिक्षण सातारा येथील सैनिक शाळेत पार पडले.एनिस करिअर अकॅडमीचे मार्गदर्शक आवारी कुटुंबीयांना भेटण्यासाठी आपल्या वणी येथे आले असताना विद्यार्थ्यांनी नेव्ही, एयर,आर्मी क्षेत्रामध्ये ऑफिसर लेव्हलची पद मिळवण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन शिबिर महेश लिपटे यांच्यातर्फे शाळेमध्ये आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरातून नवी ऊर्जा निर्माण करीत विद्यार्थ्यांना विस्तृत अशी माहिती मार्गदर्शकांनी दिली सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.