Wednesday, June 10, 2026
HomeBreakingढाबा चालक "Azad" चा Murder.......

ढाबा चालक “Azad” चा Murder…….

Ajay Kandewar,Wani:- मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीतील मार्की येथे एका ढाबा चालकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतकाचे नाव आझाद उर्फ गजानन मोरेश्वर उदकवार असे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही हत्या मंगळवारच्या मध्यरात्रीनंतर रात्री १ ते १.३० वाजताच्या सुमारास झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच मुकुटबन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू केली. मात्र, ही हत्या नेमकी का, कशी आणि कोणत्या कारणातून करण्यात आली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास केला जात आहे. संशयितांचा शोध, घटनास्थळावरील पुरावे आणि मृतकाच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तपासली जात असल्याचे समजते. या हत्येमागील कारण अद्याप गूढच असून तपासानंतरच वास्तव समोर येणार आहे.या प्रकरणातील अधिकृत माहिती, आरोपींबाबतचे तपशील आणि तपासातील महत्त्वाचे धागेदोरे समोर येताच वाचकांसाठी पुढील अपडेट प्रसिद्ध करण्यात येईल.(ही एक ब्रेकिंग बातमी असून तपास सुरू आहे. अधिकृत माहिती उपलब्ध होताच वृत्त अद्ययावत करण्यात येईल

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page