•आज भारत जोडो यात्रेत सहभागी होणार.
अजय कंडेवार,वणी:- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा निघालेल्या’ भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी काल दिनांक 14 नोव्हेंबर ला वणी येथील असंख्य महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने वंदना आवारी(जिल्हा अध्यक्षा)यांचा नेतृत्वात वाशिमला रवाना झाल्या तर आज दिनांक 15 नोव्हेंबरला डॉ. महेंद्र लोढा यांचा सक्षम नेतृत्वात वणी व मारेगाव येथील असंख्य कार्यकर्ते वाशिमला ‘भारत जोडो’रॅलीसाठी आज मंगळवारला मारेगाव येथील क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा व श्याम दादा कोलाम यांचा प्रतिमेला हार अर्पण करून समस्त काँग्रेस कार्यकर्ते एका खाजगी बसने सकाळी 8 वाजता वाशिमला रवाना झाले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दक्षिणेतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडी यात्रा महाराष्ट्रात एकूण 18 दिवस चालणार आहे.या यात्रेने सुमारे 375 किलोमीटर अंतर कापले आहे. 7 सप्टेंबर रोजी दक्षिणेतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही पदयात्रा 61 व्या दिवशी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. यात्रेतील सहभागींसाठी देगलूर येथील कलामंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ स्वागत समारंभानंतर सोमवारी रात्री यात्रेला पुन्हा सुरुवात झाली.ती रॅली आता वाशिम येथे येणार असून तिथे वणी , मारेगाव काँग्रेस कार्यकर्ते भारत जोडो रॅलीत सामील होणार आहे.
डॉ.महेंद्र लोढा ,गजाजन किन्हेकर, अंकुश माफुर, तुळशीराम कुमरे, अशोक धोबे, रविंद्र धानोरकर, विनोद आत्राम, तुकाराम वासाडे, गोपाल खामनकर, अरविंद ओकनर, आबीद आई, समिर सैयाद अशोक पांडे
प्रमोद वासेकर, संजयभाऊ खाडे, पुरुषोत्तम आवारी, प्रा शंकर वरहाटे, जयकुमार आबड, घनश्याम पावडे, आशिष खुलसंगे, विनोद गोडे, गजानन खापणे, अशोक धोबे, रवींद्र धानोरकर, साधना गोहोकार, शारदा ठाकरे, राजेंद्र कोरडे व असंख्य काँग्रेस कार्यकर्ते रवाना झाले.


