•उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत
•ओबीसी समाजाच्या हिताचे काम होत नसल्याने डॉ. जीवतोडे यांनी राष्ट्रवादीला दिली सोडचिठ्ठी.
अजय कंडेवार,वणी:- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे – राष्ट्रीय समंव्यक व विदर्भवादी तडफदार नेते डॉ.अशोक जीवतोडे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला राम राम ठोकत हजारों कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला.As there is no work for the benefit of the OBC community, Dr. Jeevtode bid farewell to NCP.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे विदर्भाच्या विकासावर मोठं लक्ष आहे, विदर्भावर होत असलेला विकास व ओबीसी बांधवांच्या अनेक हिताचे निर्णय फडणवीस घेत आल्याने त्यांच्या कार्याला बघूनच भाजप पक्षात प्रवेश केला असे डॉ. जीवतोडे यांनी म्हटले.महाविकास आघाडी सरकार मध्ये ओबीसी समाजाच्या हिताचे काम होत नसल्याने डॉ. जीवतोडे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष सोडण्यात आले असे स्पष्ट सांगितले.
“हुजूर आते आते देर करदी……!
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीला डॉ.अशोक जीवतोडे यांना “हुजूर आते आते देर कर दी असे म्हणत “‘ ओबीसी चळवळीला हेच सरकार व पक्ष संपूर्ण ताकदीने पुढे नेणार व ओबीसी समुदायाला न्याय देण्याचे काम करणार. भाजपने केंद्रात सर्वात जास्त ओबीसी मंत्री देण्याचे काम केले आहे, सामान्य कुटुंबातील चहावाला देशाचा पंतप्रधान बनला ही बाब आपल्यासाठी गौरवाची आहे. भाषणात उपमुख्यमंत्री यांनी म्हटले की,समृद्धी महामार्ग गडचिरोली पर्यंत नेणार आहो, वेळ प्रसंगी तो मार्गचंद्रपूर पर्यंत आणू असेही भाषणात म्हटले तसेच डॉ.अशोक जीवतोडे हे आधी राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये होते, राष्ट्रवादी कांग्रेसला ओबीसी समाजाचे फक्त चेहरे हवे पण ते ओबीसी नेत्यांना पद देत नाही, ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी योजना सुरु केली आहे, आधीपासूनच ओबीसी समाजाला न्याय देत आहोत, असेही उपमुख्यमंत्री यांनी त्यांचा दमदार भाषणातून म्हटले.”