•बस स्थानकासमोर भर दुपारी घडला थरार.
अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील शिंदोला येथे दि.5 ऑक्टोंबर रोजी भर दुपारी 1 वाजता स्थानिक बस स्थानकापुढील डिव्हायडर चा मध्यभागीच सिमेंटचा भरधाव ट्रक चढला. अपघातात ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. माञ कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार,MH-29BE-3299क्रमांकाचा अठरा चाकांचा सिमेंटनी भरलेला ट्रक शिंदोला ते दालमिया सिमेंट कंपनित जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली . येथील बस स्थानक परिसरातील डिव्हायडरच्या प्रारंभी सिग्नल खांबही होते तरीही त्या भरधाव ट्रक चालकाने थेट डिव्हायडरचा मधात चढविला. यामुळे ट्रकचे अर्धे चेचीसतुटले असल्याची माहिती आहे व मध्यभागी असलेले लोखंड ररस्त्यावर पडली ट्रकचे धूड रस्त्यावर उलटल्याने नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता चालक व वाहक यांना केबिनमधून सुखरूप बाहेर काढले.
अपघातात सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. परंतु या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तात्काळ पुढील बचावकार्य करण्यात आले. ट्रक चालकाला रुग्णालयात पाठविण्यात आले.