•सरपंच ,उपसरपंच ,सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार यांची उपस्थिती.
अजय कंडेवार,मारेगाव:- तालुक्यातील जेष्ठ पत्रकार माणिक कांबळे यांचा वाढदिवस मारेगाव तालुका सरपंच संघटना तथा माणिक कांबळे मित्र परिवार यांच्या वतीने पंचायत समितीच्या सभाग्रहात अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. 19 मे च्या सायंकाळी 6 वाजता केक कापण्यात आला. त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन माणिक कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.journalist Manik Kamble’s memorial service • Presence of sarpanch, deputy sarpanch, social workers and journalists.
या सोहळ्यामध्ये अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष अविनाश लांबट, अखिल भारतीय सरपंच संघटनेचे सचिव सुरेश लांडे, उपसरपंच प्रशांत भंडारी, कोथुर्ला येथील सरपंच श्रीकांत गौरकर,टाकळी येथील सरपंच गजानन आदेवार, मागली येथील उपसरपंच दिलीप आत्राम, गोंड बुरांडा ग्रामपंचायत सदस्य नंदू पवार,सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बोथले,कवडू चिंचोलकर, पत्रकार भास्कर राऊत, सुरेश नाखले भय्याजी कनाके, पाचभाई,अमोल कुमरे, संजय वानखेडे, जयंत फुलझेले, रामटेके, देठे साहेब, सहारे, यांचा समावेश होता.