अजय कंडेवार,वणी:- जि.प.शाळा भुरकी येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.ध्वजारोहण कार्यक्रम शाळा व्यव.समिती अध्यक्ष राम देऊळकर यांचा हस्ते पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राम देऊळकर यांनी भूषविले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सीमा बदकी, सचिव जीवणे मॅडम हे होते .प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त शाळा व्यव.समितीचे उपाध्यक्ष, सदस्यगण, ग्रापं.सदस्य, अंगणवाडी शिक्षिका तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभातफेरीचे आयोजन,प्रतिमा पूजन, ध्वजारोहन ,देशभक्तीपर गित गायन,विद्यार्थी भाषणे, तंबाखूमुक्ती शपथ,कुष्ठरोग प्रतिज्ञा, संविधान उद्देशिकेचे वाचन घेण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पूजा देऊळकर (स्वयंसेविका),प्रस्ताविक व आभार प्रदर्शन प्रकाश तालावार यांनी पार पाडले.कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट भोजनाने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीने मोलाचे सहकार्य केले.