अजय कंडेवार,वणी:- जि.प.शाळा भुरकी येथे दि 3. जाने रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा देऊळकर हिने केले तर आभार व प्रास्ताविक (शिक्षक)प्रकाश तालावर यांनी केले .या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान सीमा हरीचंद्र बदकी यांनी भुषविले.
प्रमुख पाहुणे म्हणून जीवणे मॅडम (सचिव), हरीचंद्र बदकी(उपाध्यक्ष),रंजना लांबट(सदस्य), ज्योती बदकी(सदस्य), स्नेहल गाडगे(सदस्य) , प्रतिष्ठित नागरिक म्हणून हरि बावणे व नाना देऊळकर हे उपस्थित होते. तसेच पालक म्हणून सौ.कोमल देऊळकर, प्रणिता देऊळकर , प्रणाली लांबट हे उपस्थित होते.
यात पाच मुली सावित्रीबाई च्या वेशभूषेत व दोन मुले जोतिबा च्या वेशभूषेत उपस्थित होते. अनेक मुलांनी सावित्रीबाई च्या जीवनावर आधारित भाषण दिले.या नंतर खावू वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.