•महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना आवारी यांचे खंबीर नेतृत्त्व
वणी:- राजूर येथे रेल्वे व वेकोलीचा माध्यमातून राजूरवासीयांच्या मूलभूत हक्कावर होत असलेल्या गळचेपी मुळे राजूर बचाव संघर्ष समितीचे वतीने बेमुदत आमरण उपोषणाला वणी येथील उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणाला गेल्या 8 दिवसापासून उपोषण सुरु होते. त्यांना 19 ऑक्टोबरला महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना आवारी व काँग्रेसचा वणी तालुक्यांतील समस्त पदाधिकारी महिलानी SDO यांना निवेदन देत राजूर बचाव संघर्ष समितीला व महिला उपोषणकर्त्याना जाहीर पाठिंबा दिला .
राजूर येथील रहिवाशी रेल्वेच्या जागेवर अंदाजे 40 वर्षापासून नागरिकांनी घरे बांधून तिथे वास्तव्य केले आहे. पूर्वी या ठिकाणी रेल्वेची मोकळी जागा होती परिसरात कोल माईन्स झाल्यामुळे कोळसा इतर ठिकाणी नेण्यासाठी कोळसा साईडिंग करण्यात आली. राहवासी 40 वर्षापासून राहत असल्यामुळे व राजूर येथे कोळसा खाणी संबंधित कामे करीत असल्यामुळे त्यांना हटविल्यासाठी वारंवार नोटिसा देत असल्याने त्यांना इतर ठिकाणी जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना त्याच ठिकाणी राहू द्यावे. त्याच ठिकाणी राहू द्यावे किंवा त्यांचे पुनर्वसन करावे. अशी शासनास महिला काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष वंदना आवारी व काँग्रेसचा महिला पदाधिकऱ्यांची मागणी आहे.
यावेळी वंदना आवारी (जिल्हा अध्यक्ष), संध्या बोबडे, तालुका अध्यक्ष,सविता ठेपाले वणी शहर अध्यक्ष ,आशा रामटेके सचिव, सरपंच विद्या पेरकावार,निलिमा काळे, मंदा बांगरे , विजया आगबत्तलवार, प्रेमीला चौधरी ,पायल डवरे, प्रणिता अस्लम निवेदन देताना, वर्षा धूर्वे, वृषाली खानझोडे, सुरेखा मेश्राम, बेबी मरसकोले, विमल तेलंग, रंजना कांबळे , पौर्णिमा कोटरंगे अश्या बऱ्याच महिलाचा उपस्थितीत निवेदन देऊन पाठिंबा देण्यात आला.