•लायन्स इंग्लिश मिडीयमचे 3 संघ विभाग स्तरासाठी पात्र
अजय कंडेवार, वणी:- शालेय शिक्षण व किडा विभागाव्दारे (२०२२ – २०२३) आयोजीत जिल्हास्तरीय टेनीस क्रिकेट स्पर्धेत लायन्स इंग्लीश मिडियम हायस्कूल व ज्युनीअर कॉलेज च्या १४ वर्षा खालील (मुली), १७ वर्षा खालील (मुली) व १७ वर्षाखालील (मुले) च्या तीनही संघाने अंतीम सामने जिंकून अमरावती विभाग स्तरासाठी पात्र ठरले.
१४ वर्षा खालील (मुली) च्या संघात स्वरा करंडे, स्वरा धोपटे, श्रावणी काळे, श्रेया मोहुर्ले, भावीका हेपट, समृध्दी देऊळकर, श्रावणी घडले, संस्कुती केळकर, सुजाता काळे, तनुष्का पिसे, मुस्कान जैन, वेदीका खोके, मानवी कटारीया, अनोखी खेमेकर, त्रिशा कोंडागुर्ले, फाल्गुणी महाकुलकर, तसेच १७ वर्षा खालील (मुली) च्या संघात मृणाल वैद्य, अनघा ऐकरे, आकांशा निकुंबे, सृष्टी खाडे, तृप्ती तेलंग, शरयु महाकुलकर, अफसाना अंसारी, सावंगी काकडे, भूमिका बदखल, लक्ष्मी नक्षीणे, सुहानी काळे, रिया लोखंडे, त्रिप्ती निषाद, श्रध्दा आस्कर, प्रियंका जांगीड, सानवी पाटील तर १७ वर्षाखालील (मुले) च्या संघात लंकी जैन, ओम बोरूले, जय निमकर, क्रिष्णा खंगार, हिमांशु वरारकर, संक्षम काकडे, तन्मय मालेकर, हिमांशु वाणी, आभास गणवीर, जुनेद खान, ओम पारखी, सिध्दांत तेलतुबंडे, आयुष पुसदकर, तन्मय राजुरकर, रक्षित काळे, कासिफ रिजवी या खेळाडूचा समावेश होता.
संघाच्या नेत्रदिपक यशा बद्दल सर्व खेळाडू व किडा प्रशिक्षक अविनाश ऊईके यांचे संस्थेचे अध्यक्ष लायन शमीम अहमद, उपाध्यक्ष लायन डॉ. के. आर. लाल, सचिव लायन महेंद्र श्रीवास्तव, कोषाध्यक्ष लायन रमेश बोहरा, संचालक लायन डॉ. आर.डी.देशपांडे, लायन सुधीर दामले, लायन सी. के. जोबनपुत्रा, लायन बलदेव खुंगर, लायन मंजिरी दामले प्राचार्य प्रशांत गोडे व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले.