देव येवले,झरी:- जबरी चोरी प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी झरी बी.एस.वाढई यांनी आरोपी दत्ता सुरेश लिंगरवार वय ३५ वर्षे रा.सदोबा सावळी ता.आर्णी जि.यवतमाळ यास दोन वर्षे २०००/- रुपये दंडाची सश्रम कारावासाची शिक्षा दी. १९/०१/२०२३ रोजी सुनावली आहे.सविस्तर , झरी तालुक्यातील पोलीस स्टेशन मुकुटबन अंतर्गत .दि.३०.११.२०१९ रोजी फिर्यादी ही तीचा सासुसोबत शेतात कापुस वेचत असताना सासु ओंजळीतील कापुस खाली करण्यासाठी गेली असताना मागुन कोणीतरी अज्ञात ईसमाने शेतात येवून फिर्यादीचे तोंडात व डोळ्यात माती टाकुन ओरडशील तर याच ठिकाणी मारुन टाकतो अशी धमकी देत कानातील सोन्याचे झुमर सोन्याची पोत तसेच एक मोबाईल असा एकुण ९८०००/- रुपयेचा मुद्देमाल हिसकावून पळुन गेला वरुन फिर्यादी ही पतीसह पोलीस स्टेशन मुकुटबन ला जावुन घटनेचा रिपोर्ट दिला वरुन पोलीसांनी आरोपी विरूद्ध भादवीचे कलम ३९२,५०६ अंतर्गत गुन्हा नोंद केला.
या गुन्हाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांनी करून प्रकरणात आरोपीस अटक करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ केले .प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने फिर्यादी, तपास अधिकारी यांचे सह अकरा साक्षदारांचे पुरावे नोंदविण्यात आले. यात साक्षीदार श्रीकांत जिंदमवार पोलीस उपनिरीक्षक स्था.गु.शा.यवतमाळ, गोल्हर नायब तहसीलदार झरी, रमेश गुडा मुथुट फायनान्स अदिलाबाद यांची साक्ष महत्त्वाची ठरली तसेच ईतर साक्षदाराचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली यात सरकारी पक्षाचे वतीने सहाय्यक सरकारी वकील पी डी कपुर व ठाणेदार अजित जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी जमादार मारोती टोंगे व नापोका संतोष मडावी यांनी काम पाहीले.