वणी (अजय कंडेवार) :“आमदार म्हणजे सेवक, जनतेचा आधार” — या विचाराला खऱ्या अर्थाने न्याय देत वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयभाऊ देरकर यांची ओळख जनतेचा कैवारी म्हणून वणी विधानसभेत अधिकाधिक बळकट होत आहे.
जनतेच्या अडचणींना स्वतःच्या समस्या समजून त्यावर उपाय शोधण्यासाठी धडपड करणारा नेता म्हणजे वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयभाऊ देरकर सुखदुःखात नेहमी लोकांसोबत राहणारा आणि “आमदार हा जनतेचा सेवक” या विचाराला प्रामाणिकपणे न्याय देणारा नेता म्हणून त्यांची ओळख सतत बळकट होत आहे.खनिज संदर्भातील प्रश्न असो,गावागावात रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य सेवा, शिक्षण यांसारख्या मूलभूत सोयींच्या प्रश्नांवर संजयभाऊ सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता त्यांना “खरा कैवारी आमदार” म्हणून मान्यता देत आहे.
अलीकडेच शेतकऱ्यांच्या तातडीच्या समस्यांवर त्यांनी प्रशासनाशी चर्चा करून दिलासा दिला. तर दुसरीकडे आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, महिलांच्या स्वावलंबनासाठी सुरू केलेले उपक्रम यामुळे त्यांच्या कार्याचा ठसा उमटला आहे.आजच्या राजकारणात नेत्यांचा जनतेपासून दूरावा वाढत असताना, “२४ तास उपलब्ध आमदार” अशी संजयभाऊ देरकर यांची प्रतिमा लोकांच्या मनावर अधोरेखित होत आहे.त्यामुळे मतदारसंघातील सर्व स्तरातील नागरिक त्यांना कौतुकाने “जनतेचा खरा कैवारी आमदार” म्हणून गौरवू लागले आहेत.
•जनतेशी नाळ जुळलेली” प्रतिमा….
अलीकडेच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाशी तातडीने चर्चा करून त्यांनी दिलासा मिळवून दिला.आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, महिलांच्या स्वावलंबनासाठीच्या योजना या सर्व उपक्रमांमुळे त्यांची “जनतेशी नाळ जुळलेली” प्रतिमा आणखी ठळक झाली आहे.
• जनतेची प्रतिक्रिया
“आमदार असावा तर असा…! नेहमी हसतमुख, मदतीला तत्पर आणि २४ तास उपलब्ध.”असतात.– स्थानिक नागरिक

