अजय कंडेवार,वणी : गावातील शांतता भंग करणारी धक्कादायक घटना सोमवार (ता.१८) सकाळी वागदरा गावातील ४ दिवसापासून बेपत्ता असलेल्या अंदाजे ६० वर्षीय इसमाचा मंदर गावाजवळील एका बार मागचे शेतशिवारात नग्नावस्थेत मृतदेह आढळला.या इसमाचा दगडाने ठेचून निर्दयपणे खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे . या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. यदा कदाचित जर खून झाला असेल तर यातील गुन्हेगार कोण आहेत आणि खूनामागचे कारण काय, याचा वणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.या घटनेनंतर गावात “इतका निर्दयीपणा का करण्यात आला?”, “नेमका वाद कशामुळे झाला असेल?”, अशा प्रश्नांची कुजबुज सुरू आहे. गावकऱ्यांचा तर्क असा की, जुना वाद, तंटा किंवा वैरातून ही हत्या झाल्याची शक्यता आहे.दरम्यान, या खुनामुळे नागरिक अस्वस्थ झाले असून, आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

