•युवासेनेने घेतला पुढाकार
अजय कंडेवार,वणी :– रंगनाथ स्वामी
तीर्थस्थळी दरवर्षी जत्रा होत असल्याने भक्तिमय वातावरण या नगरीत नेहमीच असते. याशिवाय या ठिकाणीं मोठी जत्रा देखील असल्याने लोकांची मोठी लगबग जत्रा परिसरात असते. मात्र, याच परिसरात मांस (meat shop) विक्रीची दुकाने असल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या जात असल्याने युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी पुढाकार घेत दि.6.मार्च 2023 रोज सोमवारला मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मांस विक्री (meat Shop) दुकाने हटवावी अशी मागणी केली आहे.
शहराचे आराध्य दैवत असलेले रंगनाथ स्वामी यांच्या नावाने मार्च महिन्यात तब्बल 37 दिवसाची जत्रा भरते. आणि विशेष म्हणजे ही जत्रा मागील कोरोनाकाळात भरली नाही. कोरोनाकाळात खंड पडलेली रंगनाथस्वामी जत्रा दि.3. मार्चला नगरपरिषदचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांचा हस्ते रंगनाथ स्वामी मंदिरात पुजाविधी करून जत्रेला सुरुवात झाली आहे.काही प्रमाणात दुकाने देखील जत्रा मैदान परिसरात थाटण्यास सुरुवातही झाली असून जत्रा भरण्यास सुरुवात झाली आहे. परंतु आराध्य दैवत असलेल्या जत्रेत मात्र मांस विक्रीचे दुकाने सुरू असल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहे.तरी जत्रेच्या राखीव जागेवरील मांस विक्रीचे दुकाने तात्काळ हटविण्यात यावें अशी मागणी युवासेनेेचा कार्यकर्त्यांनी केली आहे.
यावेळी युवासेनेचे कार्यकर्ते मिलिंद बावणे, विशाल घाटोळे, दुर्व येरणे, अमृत फुलझेले, अभिजित सुरसे, सिनू दासारी आदि उपस्थित होते.