●विशेषतःसमाजबांधवानी हातात खजुराची पाने घेऊन भव्य रॅली काढीत जणू काही प्रभू येशूचे जोरदार स्वागतच केले ही लक्षवेधी बाब…….
अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील सर्वात मोठ्या गावात फ्री मेथॉडिस्ट राजूर चर्चचा ख्रिस्त बांधवांनी दिनांक 2 एप्रिल 2023 ला सकाळी 8 वाजता हातात खजुराची पाने घेऊन भव्य रॅलीत काढत “पाम संडे” जल्लोषात साजरी करण्यात आली. या गावातील ख्रिस्त बांधवानी मागील 60 वर्षाची परंपरा कायम ठेवलीआहे ही विशेष बाब..Christ Brothers at Free Methodist Rajur Church “Palm Sunday” celebration..
येशू ख्रिस्त (Jesus Christ) यांना मानवतेचा अवतार मानला जातो, ज्यांनी मानवाच्या कल्याणासाठी हसता हसत सुळावर जाणे पसंत केले. काही ठिकाणी असेही म्हटले जाते की- ‘Jesus died for our sins’. तर गुड फ्रायडे (Good Friday) च्या दिवशी येशूला वधस्तंभावर चढवण्यात आले, त्याच्या आदल्या रविवारी येशूचे जेरुसलेम (Jerusalem) नगरीत आगमन झाले होते. येशूचा नगरीत झालेला प्रवेश हा तिथल्या नागरिकांनी खजुराची पाने दाखवून साजरा केला होता. त्या दिवसाची आठवण म्हणून आजही जगभरातील ख्रिस्ती बांधव हा दिवस ‘पाम रविवार’ किंवा ‘पाम संडे’ (Palm Sunday) म्हणून साजरा करतात. यंदा हा दिवस रविवार, 2 एप्रिल रोजी साजरा केला गेला.
पाम संडेला पवित्र आठवड्याची (Holy Week) सुरुवातही मानली, ज्याचा शेवट इस्टर (Easter) म्हणून साजरा केला जातो. पाम संडे या दिवसाविषयी म्हटले जाते की, जेव्हा प्रभु येशू जेरूसलेमला पोहचले, तेव्हा मोठ्या संख्येने लोक त्याचे स्वागत करण्यासाठी हातात खजुराची पाने घेऊन उभे होते. तिथल्या जनतेने प्रभु येशूची शिकवण व चमत्कारांचे जोरदार स्वागत केले. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.
म्हणून यादिवशी राजूर फ्री मेथोडीस्ट राजूर चर्चमध्ये विशेषतःप्रार्थनेचे आयोजन केले. तसेच समाजबांधव खजूरचे पाने हातात घेत ख्रिस्त बांधव संपूर्ण गावात मोठी रॅली काढण्यात आली .खजुराच्या पानांना या दिवशी खास महत्व असते, या पानांचा क्रॉस बनवन्यात आले.या प्रकारचे खास क्रॉस घरात किंवा गाडीत ठेवले जाते. खजुराचे झाड हे विजय आणि चांगुलपणा यांचे प्रतिक मानले जायचे व त्यामुळे आजही या झाडाचे विशेष महत्व आहे.
यावेळी रॅलीचे आयोजन फ्री मेथॉडिस्ट चर्च कोर कमिटी व युवा कमिटीने केले. या रॅलीत अध्यक्ष पास्टर गिरीष शिरमनवार सचिव डेविड पेरकावार ,खजिनदार प्रकाश तालावार , सरपंच विद्या पेरकावार, बाबू कुक्कलवार, प्रवेश तालावार , आशिष पेरकावार,अब्राहम कलवलवार ,शाम संगमवार,पेतरस पारखी,समुवेल येलपुलवार, अजय कंडेवार, विनोद तांड्रा, समस्त युवकवर्ग, पुरुषवर्ग,महिलावर्ग व समाजबांधव होते.