Sunday, August 30, 2026
HomeBreaking Newsचेंडकापूर शिवाराचा सौद्यात "तो खादाड"रेतीतस्करांच्या संपर्कात..

चेंडकापूर शिवाराचा सौद्यात “तो खादाड”रेतीतस्करांच्या संपर्कात..

Ajay Kandewar,Wani:- वणी तालुका रेतीची खाण समजला जाणारा तालुका आहे. या तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदी पात्र, विदर्भा नदी पात्रातील रेतीची मोठ्या प्रमाणात खुलेआम तस्करी होत आहे. ही तस्करी रोखण्यासाठी नेमलेलाच “तो खादाड” रेतीतस्करांच्या ओटीत जाऊन बसल्याने रेतीचे उत्खनन व विनानंबरच्या ट्रॅक्टर ने ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वणी तालुक्यात रेती, माती, मुरूम, दगड अशी गौणखनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यातील विदर्भा नदी पातत्रातील रेती पंचक्रोशीत प्रसिद्ध असल्याने रेतीचे येथून बेकायदा उत्खनन व वाहतूक करून खासगी व शासकीय कामांवर खुलेआम पुरवठा केला जात आहे. शासननियमांची पायमल्ली करीत महसूल प्रशासनाच्या काही कर्मचाऱ्यांनी स्वहित साधत, खुर्चीचा गैरवापर करीत रेतीचा “मलिदा रवंथ” करीत आहेत. परिणामी, वणी तालुक्यातून प्रवाहित होणाऱ्या विदर्भा नदीपात्रातून अहोरात्र रेती चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे.

चेंडकापूरचें तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात असताना बेकायदा रेतीची वाहने बाजूला असलेल्या रस्त्यांवरून धावताहेत. बैठ्या व महसूलच्या फिरत्या पथकाकडून रेतीतस्करी करणाऱ्या वाहनांवर अद्याप पाहिजे तशी ठोस कारवाई न करता “न्युज से क्या होता, असे किती लागतात….”असे काहीं साहेब म्हणत असतील पण जिवंत पुरावे जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यास टीम विदर्भ न्युज सज्ज आहे. यावर येथील “खादाड”कोण……19×5 हे कोडं काय? एंट्री फी काय….? , “बातम्या लागल्या आहे दोन दिवस बंद ठेवा रे असे कोणी म्हटले”…या बाबतीत सविस्तर चर्चा करणार आहे . हे सत्य .

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page