Thursday, October 22, 2026
HomeBreaking Newsसाहेब ..... '"खादाड" च्या सेटिंगने " टुंड्रा "गावात रेती तस्करी बिनधास्त......!

साहेब ….. ‘”खादाड” च्या सेटिंगने ” टुंड्रा “गावात रेती तस्करी बिनधास्त……!

•तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांची रेती तस्करांवर कृपादृष्टी. •अद्यापही कारवाईला वरिष्ठांचा ठेंगा. "जिओ और जिने दो "अशी स्थिती.

Ajay Kandewar, Wani:- तालुक्यातील टुंड्रा गावातुन धुंनकी (नवेगाव) या चोरट्या मार्गावरून विदर्भा पात्रातून आता तस्करांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. वर्धा नदीपात्रातील रेतीतस्करी थांबायचे नाव घेत नाही. मजुरांच्या माध्यमातून नदीपात्रातून अहोरात्र रेतीचा बेसुमार उपसा केला जात असताना टुंड्रा भागाचे तलाठी मंडळ अधिकाऱ्यांकडून कारवाईला ठेंगा दाखविला जातो आहे.

झरी तालुक्याचे तहसिलदार यांनी त्यांचा कार्यक्षेत्रात रेती तस्करी रोखण्यासाठी जीवाचे रान केले. काही प्रमाणात ते रेती तस्करी रोखण्यात यशस्वी देखील ठरले. मात्र, वणी तहसिलदार यांना व त्यांचा पथकांना कायर, चेंडकापूर,टुंड्रा व नेरड, मलकापूर भागात असणारी विदर्भा नदी पत्राकडे भेट देउन पाहण्यासाठी वेळ मिळत नसल्याने रेती तस्कर अमाप वाढले आहेत यात काहीं शंका नाहीच.वणी तहसीलदाराचें लक्ष असते तर त्यांचे नेमलेले तलाठी, मंडळ अधिकारी कडून परिपूर्ण माहिती घेऊन कारवाईचा आलेख नक्कीच वाढविला असता पण तसे न करतां उलट झाले आहे .” त्या खादाड ” वर वरिष्ठांचीच कृपा असल्याचं चित्रं सद्यस्थितीत दिसून येतं आहे . याचाच पूर्णपणे फायदा घेत टुंड्रा गावात अवैध घाटात रेती तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात कुठेही रेतीघाटांचा लिलाव झाला नसताना “त्या खादाड “ चा मदतीने या घाटातून अहोरात्र रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे. येथील रेती दर्जेदार असल्याने यातून “तो खादाड “ रेतीचोरट्याकडून ” मोठा मलिदा “ लाटून अनेकांच्या तोंडाला कुलूप लावले.यंत्रणेतील खाबूगिरांनी मलिदा लाटल्याने त्यांनीही रेतीतस्करांसोबतची निष्ठा जपली आहे. त्यामुळे टुंड्रा गावात विदर्भा पात्रातून रेती तस्करी रोखण्यात महसूल व पोलीस प्रशासनाला यश आलेले नाही.

•झरि तहसीलदार ॲक्टिव्ह तर वणी तहसीलदार गप्प का…..

झरि तहसीलदार हे बिनधास्तपणे कोणताही नदी पात्रात जाऊन धडाकेबाज कारवाईचा उद्देशाने रात्री -बे- रात्री जात असल्याने तेथील रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.पण वणी तालुक्यांत तर रेती तस्करांना सुगीचे दिवस सूरू आहे विशेष यात वणी तहसीलदार ॲक्टिव्ह का नाही प्रश्नच…? माजी आमदार संजिवरेडी बोदकुरवार यांनी खुद्द तालुक्यांतील झोला शिवारात खुलेआम मशिनने पोखरून रेती तस्करी सूरू असल्याची प्राथमिक माहित पुढे आणून दिली तेंव्हा वणी प्रशासन जागे झाले अशी चर्चा होती. आताही माजी आमदार पुढाकार घेऊन झोपलेल्या प्रशासनाला जागे करेल यातही शंका उरली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page