Monday, April 27, 2026
HomeBreaking Newsराजूर व कायर येथे "बोगस डॉक्टर टोचताहेत मोठ्ठे इंजेक्शन...."

राजूर व कायर येथे “बोगस डॉक्टर टोचताहेत मोठ्ठे इंजेक्शन….”

•आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरांचे 'ऑपरेशन' कधी? •नागरिक व लहान बालकांचा आरोग्याशी खेळ.

Ajay Kandewar,Wani : कोणती पदवी ना कुठली शाश्वती आठ-दहा वर्षांपासून कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसणाऱ्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांनी भोळ्याभाबड्या जनतेची आर्थिक लूट करण्यासोबतच त्यांच्या जिविताशीही खेळ चालविला आहे. जास्त भावाने स्वत: जवळचे गोळ्या औषध व सलाईन देवून जनतेची फसवणूक पुरुष गब्बर बनले आहेत. या बिनडिग्री बोगस डॉक्टरांच्या उपचार याबाबत काही अनुभव व अनभिज्ञ असून रुग्णांकडून” 700 की सलाईन और 1000 का बिल “असे चित्र या बोगस डॉक्टरकडून उभे करून रुग्णांच्या घरच्यांची समजूत काढून त्यावर पडदा टाकण्याचे काम या बोगस डॉक्टरांकडून सतत केले जाते.

तालुक्यांतील राजूर व कायर बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असताना आरोग्य विभाग स्पष्ट दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. सध्या सर्दी, खोकला, तापीचे आजार वाढल्याने बोगस डॉक्टर सक्रिय झाले आहे. त्यामुळे आरोग्य विभाग बोगस डॉक्टरांचे ऑपरेशन कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राजूर व कायर येथील नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत बोगस डॉक्टरांनी अनेक गावांमध्ये दवाखाने थाटले आहे. या दोन्हीं गावात काही प्रमुख बाजारपेठा आहे. या बाजारपेठांना अनेक गावे जोडलेली आहे. त्यामुळे या गावांमधील नागरिक खरेदीसाठी तालुक्याच्या ठिकाणी येण्याऐवजी याच बाजारपेठ असलेल्या गावांकडे धाव घेतात.

हीच संधी हेरून अनेक बोगस डॉक्टारांनी दवाखाने थाटले आहे. कुठलाही वैद्यकीय परवाना नसताना केवळ गोळ्या, औषधीच नाही तर इंजेक्शन, सलाइन देऊन जवळपास अंदाजे अवाढव्य 1000 ते 1500 रू घेऊन उपचार करीत आहे. त्यामुळे राजूर व कायर भागातील नागरिकांच्या जीवित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकदा रुग्णाची प्रकृती बिघडल्यानंतर हात वर करून बोगस डॉक्टर शहराकडे जाण्याचा सल्ला देत असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी काही बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाने धाडी टाकून कारवाया देखील केल्या. मात्र राजूर व कायर येथे बोगस डॉक्टरांकडून रुग्ण तपासणीचा गोरखधंदा सुरूच आहे. त्यामुळे ही मोहीम राबवून बोगस डॉक्टरांवर ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

बोगस डॉक्टरांना अभय कोणाचे…?

तालुक्यात बोगस डॉक्टरांची संख्या वाढत असताना अधिकाऱ्यांचें याकडे दुर्लक्षआहे. बोगस डॉक्टर गावात मोठ्यासंख्येने असताना बोगस डॉक्टरची तक्रार येईपर्यंत T.H.O व D.H.O मुंग गिळून असतात.इतरांना अभय कोणाचे,यामध्ये कोणाचे आर्थिक हितआहे,सध्या रुग्णाच्या जिवाशी बोगस डॉक्टर खेळत आहेत याला कोणाचा आशीर्वाद आहे काय?असे प्रश्न जनता विचारीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page