अजय कंडेवार,वणी :- आज जागतिक चालक दिनानिमित्त वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी च्या वतीने शहरातील व राष्ट्रीय महामार्गावरील वाहन चालकांचे गुलाबाचे पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. #World #Driver’s #Day.
दळणवळण व परिवहन क्षेत्रांत वाहनचालकांचे मोठे योगदान आहे.आज दिनांक 17 सप्टेंबर ला वाहन चालक दिनानिमित्त वणी वाहतूक नियंत्रण शाखेने अभिनव उपक्रम राबवून वाहन चालकांचा सत्कार करीत वाहतूक नियमांचे पालन करीत वाहन चालवावे असा संदेश दिला.
या उपक्रमाची सुरुवात वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि
संजय आत्राम यांनी गुलाबाचे फुल वाहन चालकाला देऊन सत्कार करीत केला .