•या प्रकरणात “हवा देणारा “तो”कोण “? अशीही शहरात चर्चाही सुरू.
अजय कंडेवार,वणी: नवजात बाळ प्रकरणी शहरातील ज्येष्ठ चिकित्सक डॉक्टर महेंद्र लोढा यांच्याबाबत सोशल मीडियात बदनामीकारक मजकूर व्हायरल करण्यात आला. या प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणा-यांवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी शहरातील डॉक्टरांच्या विविध संघटनेद्वारा उपविभागीय अधिकारी वणी व ठाणेदार वणी यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणी योग्य ती कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन केले जाईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या प्रकाराचा निषेध म्हणून मंगळवारी शहरातील संपूर्ण डॉक्टर काळ्या फिती लावून रुग्णसेवा देणार आहे.All four doctors’ associations united for Dr. Lodha…In this case, “Who is the giver of air”? There is also a discussion going on in the city.
निवेदनात म्हटले आहे की डॉ. महेंद्र लोढा हे परिसरातील एक ज्येष्ठ आणि सुपरिचित चिकित्सक आहेत. त्यांचे स्वत:चे सुसज्ज असे हॉस्पिटल आहे. मात्र त्यांचा अनुभव व ज्ञानाचा सर्वसामान्य रुग्णांना फायदा व्हावा यासाठी ते ग्रामीण रुग्णालयात देखील रुग्णसेवा देतात. नवजात बाळाच्या प्रकरणी त्यांनी त्यांचे कर्तव्य योग्य प्रकारे निभावत रुग्णाला योग्य तो सल्ला दिला होता. महिलेला पुढील लेव्हलची सोनोग्राफी करण्याबाबत रेफर लेटर देखील डॉ. लोढा यांनी दिले होते. मात्र त्यांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन रुग्णाद्वारे झाले नाही.
या प्रकरणी नवजात बाळाच्या कुटुंबीयांतर्फे पोलीस ठाण्यात रितसर तक्रार करण्यात आली. सदर प्रकरण मेडिकल कौंसिलकडे सोपवले जाणार आहे. मेडिकल कौंसिल संपूर्ण चौकशी करून त्याचा निकाल येईल. चौकशीत जो काही निष्कर्ष येणार तो आम्हाला मान्य असेल. मात्र हलगर्जीपणा केल्याचा कुठलाही निष्कर्ष निघण्याआधीच डॉ. लोढा यांची बदनामी सुरू आहे.
गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियात डॉ लोढा यांचा फोटो टाकून जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. ही केवळ एका डॉक्टरची नाही तर शहरातील संपूर्ण डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्राची बदनामी आहे. अशा घटनांमुळे डॉक्टरांवर प्रचंड दबाव येतो व परिणामी डॉक्टरांचे मनोबल ढासळून त्याचा डॉक्टरांच्या प्रॅक्टिसवर परिणाम होत आहे. डॉक्टर लोढा यांची बदनामी करणा-या प्रकारामागचा सूत्रधार शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच बदनामीकारक फोटो व्हायरल करणा-यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन वणीचे अध्यक्ष डॉ शिरिष कुमरवार, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ रमेश सपाट, होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ. किशोर कोंडावार, डेन्टल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड यांच्यासह या चारही संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.