- •’या ‘ गावातील सरपंचाने घातले तहसिलदाराला निवेदनाद्वारे साकडे.
अजय कंडेवार, वणी :- येथील स्मशानभुमिकडे जाणाऱ्या तसेच त्या मार्गाने शेतातही जाणाऱ्या मार्गाला आडा बसला आहे. अशीच एक बाब वडगाव या गावातील…. एका शेतकऱ्याने स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे खोदकाम केले. त्या मार्गाने जाणाऱ्या शेतकऱ्याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच काहीं शेतकऱ्यांची त्यांच्या शेतातून जाणारा रस्ता जेसीबीद्वारा खोदल्याने वहिवाटही बंद होण्याचा मार्गावर येऊन ठेपला आहे तसेच स्मशानभुमिकडे जाणारा रस्ताही बंद झाला आहे. आता गावातील शेतकऱ्यांनी तसेच जनतेने करावे तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाल्याने वणी तहसिलदार निखिल दुळधर यांनी शासकीय नियमानुसार मार्ग मोकळा करून देण्याकरिता वडगांव गावातील सरपंच अर्चना डाखरे यांनी निवेदनातून साकडे घातले आहे.The road leading to the cemetery was dug.The sarpanch of this village submits a statement to the tehsildar.
सविस्तर,मौजा, वडगाव टिप येथील गट.क्र. 35 मधील एका शेतकऱ्याने गट.क्र.5 मध्ये असलेल्या स्मशानभूमिकडे जाणा-या रस्त्यावर गट.क्र.35 ला लागून असलेल्या रस्त्यावर खोदकाम करून रस्ता खराब करण्यात आलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या -जाणाऱ्या शेतकऱ्यांना लोकांना नाहक होत आहे.त्यामूळे शासकिय नियमानुसार रस्ता मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी सरपंच व गावातील नागरीक करीत आहे.
स्वतः गावातील सरपंच यांनी निवेदन तहसीलदाराला देऊनही यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी तसेच सरपंच यांनीही केला आहे. याप्रकरणात काही घोळ असल्याचीही ओरड होत आहे. त्यामुळे सरपंचाच्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली का? उपाययोजना प्रशासन करेल का? याकडे गावातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.