•पालकाने केली थेट वरिष्ठाकडे तक्रार.
वणी तालुक्यातही असू शकते असा गबाड…. पालकांनी सतर्क असणे गरजेचे.
देव येवले,झरी :- हा तालुका आदिवासी बहुल तालुका असल्याने कुपोषित बालकाचे प्रमाण कमी करण्यासाठी इथे विशेष मोहिमा ही राबविल्या जातात. त्यासाठी अंगणवाडीना विशेष महत्व दिल्या जाते. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना प्राथमिक शिक्षण, अमृत आहार, गरोधर मातांना मार्गदर्शन व पोषण आहार दिल्या जाते. मात्र माथार्जुन येथील अंगणवाडी क्र. १ व २ च्या सेविकांनी चक्क पोषण आहारावर डल्ला मारल्याचा आरोप तेथील पालक संभाजी राऊत यांनी तक्रारीच्या माध्यमातून केला आहे.


माथार्जुन येथील पालक संभाजी राऊत यांनी आपल्या बालकास मिळणारा अमृत आहार हा वेळोवेळी अपुरा मिळत असल्याबाबत सबंधित सेविकेला विचारणा केली. मात्र सेविकेकडून याबाबत कुठलेच उत्तर दिल्या गेले नाही. त्यामुळे माहिती अधिकार अधिनियम २००५ (३) नुसार २०२० ते २०२२ वर्षातील दोन्ही अंगणवाडीतील पोषण आहार, अमृत आहार माहिती संदर्भात प्रथम अपिलीय अधिकारी याचेकडे अर्ज दाखल केला. मात्र मुद्दत संपूनही माहिती मिळाली नाही. त्यामुळे अपिलीय अर्ज दाखल केला असता, सुनावणी अंती चुकीची व अपूर्ण माहिती देण्यात आली. सविस्तर माहिती विचारली असता संबंधिता कडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आले. देण्यात आलेल्या अपुऱ्या माहीतीतूनच उघड झाले की शासनाकडुन लहान बालकांना, गरोदर मातांना येणारा पोषण आहार अमृत आहार नियमित वाटप करीत नसुन स्वता दोन्ही अंगणवाडी सेवीका अपहार करीत आहे. या प्रकरणात वरीष्ठ कर्मचारी तथा अधिकारी यांचे साटेलोटे नाकारता येत नाही.


त्यामुळे या प्रकरणी तक्रारकर्ता, महिला, गरोदर माता, पालक वर्ग गावकरी यांचे समक्ष याची चौकशी जिल्हा स्तरीय समिती यवतमाळ याचे मार्फत करण्यात यावी. शासनामार्फत मिळणाऱ्या बालकांना, गरोदर माता यांना मिळणाऱ्या पोषण आहाराची लूट थांबवावी. व लाभार्थी बालकांना व गरोदर मातांना न्याय मिळवून दयावा, व संबंधित दोषीवर कार्यवाही करावी अशी तक्रार महीला बाल विकास कल्याण मंत्री, महीला व बाल कल्याण विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हा अधिकारी यवतमाळ, महीला व बाल कल्याण विभाग जी.प. यवतमाळ यांच्याकडे संभाजी राऊत यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे.
