•”लल्या “पोलिसांचा ताब्यात.
•पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.
अजय कंडेवार,वणी :– एकीकडे गुन्हेगारीचा आलेख कमी व्हावा, यासाठी पोलीस दलाने व्यापक प्रयत्न सुरू केले आहे. सामान्य यवतमाळकराला सहज निर्भयपणे फिरता यावे, असे वातावरण शहरात नव्हे तर जिल्ह्यात निर्माण करायचे आहे.त्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन MPDA सारख्या कारवाई सुरू असतानाच जिल्हयातीलच विविध भागांमध्ये गुंडांचे प्रमाण वाढत असून खंडणीसाठी धमकी देण्याचे प्रकारदेखील दिसून येत आहेत. असाच एक प्रकार मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे त्यात एकाने तर चक्क बंदुक कानावर ठेवत त्याला ‘फिल्मीस्टाईलने’ 5 लाख कॅश व 2 लाख रू हफ्ता अशी खंडणी मागितल्याची घटना समोर येताच Dysp गणेश किंद्रे यांचा मार्गदर्शनात मारेगाव ठाणेदार खंडेराव यांनी सैय्यद मन्सूर सैय्यद दाऊद यांचा तक्रारीवरून ललित उर्फ लल्ला अरुण गजभिये (वय-33 वर्ष) रा. विदर्भ सोसायटी, यवतमाळ यांचा विरोधात बुधवार चा मध्यरात्री 2 वाजता मारेगाव पोलीस स्टेशन येथे विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला .
सविस्तर वृत्त, तक्रारदार सैय्यद मन्सूर सैय्यद दाऊद (वय 34), रा.डेहनकर ले-आऊट,भोसा,यवतमाळ हा सन 2022-23 या कालावधी करीता मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील वर्धा नदीच्या रेती घाटाचे टेंडर घेतले. तसेच शासनाच्या परवानगीने काही रेती साठा करून ठेवली असून त्यातील रेती ज्या लोकांनी शासना कडे मागणी करुन बुक केलेली आहे ती त्या लोकांना वाटप सुध्दा करने सुरु आहे असे तक्रारीत म्हंटले आहे.परंतू सैय्यद मन्सूर यांचा कोसारा रेती डेपोवर कामावर असणारा विकास झंजाळ याला काहींनी फोन द्वारा म्हटले की,मन्सुरचा भाऊ कादर फोन उचलत नाही आहे त्याचाकडुन रेती घाटाचा हफ्ता घ्यायचा आहे जर त्याने 5 लाख रुपये दिले नाही तर कलेक्टरकडे व आपले सरकार पोर्टलवर तक्रार करोल असा निरोप सैय्यद मन्सूरचा भाऊ कादर याला द्यायला सांगितले परंतु कोसारा घाट नियमाप्रमाणे चालवित असल्याने सैय्यद मन्सूर याने लक्ष दिले नाही. असेही तक्रारीत म्हंटले आहे.
शेवटी दि.13 सप्टेंबर बुधवार रोजी सायं.7.30 वाजताचा दरम्यान सैय्यद मन्सूर हा कोसारा ता.मारेगाव येथील शासकीय रेती डेपो पासुन काही अंतरावर रोडवर असलेल्या निंबाच्या झाडाजळ डेपोवरील काम करना-या लोकांशी चर्चा करीत असतांना आरोपी ललीत उर्फ लल्या अरुन गजभिये हा रा.विदर्भ हाऊसींग सोसायटी, यवतमाळ हा 3अनोळखी साथीदारांसह चारचाकी I-20 ने आला व त्याने रेती डेपोची केलेलीं तक्रार मागे घेण्याकरीता 5 लाखाची खंडणी मागीतली व त्याने घोडा ( बंदुक ) काढुन तक्रारदाराचा कानाजवळ लाऊन 5 लाख रु. नगदी व 2 लाख रु. (हफ्ता )नाही दिला तर जिवे मारण्याची धमकी दिली व साथीदारांपैकी एकाने तर चाकु काढुन पोटाला लावताच तेथील उपस्थित असणारे दिवानजी व सुपरवाईजर यांनी ललीत उर्फ लल्ल्या याला “मन्सुर सेठ को छोड दो तेरा हफ्ता मिल जायेगा” अशी विनंती केल्याने लल्लाने बंदुक कानाजवळुन काढुन साथीदारांसह निघुन गेला.सैय्यद मन्सूर घामाचित्त घरी येताच घडलेल्या घटनेची आपबिती घरी सांगितली असता त्यांनी परिवारासोबत मारेगाव पोलीस स्टेशन गाठत रितसर तक्रार दिली असता भा.द.वी.कलम 307,384,386,34 सहकलम 3,25 आर्म ॲक्ट अश्या विविध कलमं अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई DYSP गणेश किंन्द्रे यांच्या मार्गदर्शनात मारेगाव ठाणेदार API जनार्धन खंडेराव यांचा सुचनेने PSI ज्ञानेश्वर सावंत,अजय वाभीटकर व रजनीकांत पाटील यांनी केली. पुढील तपास PSI ज्ञानेश्वर सावंत करीत आहे.