Thursday, May 15, 2025
Homeझरीघरपोच गॅस सिलेंडरच्या नावाखाली लुट ..!

घरपोच गॅस सिलेंडरच्या नावाखाली लुट ..!

• गॅस एजन्सीवर चौकशी करून कठोर कारवाई होणे गरजेचे

देव येवले,झरी (वा.) :- तालुक्यात ग्रामीण भागामध्ये घरघुती व व्यावसायिक एल.पी.जी. गॅस सिलेंडर घरपोच देण्याच्या नावाखाली गॅस एजन्सी निर्धारित मूल्यापेक्षा अतिरिक्त कर आकारून जादा दराने विक्री करून ग्राहकांची लुट करत आहे.

    झरी तालुका हा आदिवासी बहुल तालुका असल्याने येथे शेतमजूर लोक मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्याचे प्रमाण हि जास्त आहे. गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीमुळे जन-सामान्याचे बजेट बिघडत असून, वितरकाकडून ग्राहकाच्या खिशाला कात्री लावल्या जात आहे. तालुक्यात अधिकृत गॅस एजन्सी जास्त नसल्याने वणी येथील गॅस एजन्सीज तालुक्यात सिलेंडरचा पुरवठा करीत आहे. मात्र पेट्रोलियम व गॅस मंत्रालय भारत सरकार व एल.पी.जी. गॅस कंपनी यांनी निर्धारित करून दिलेल्या मूल्यामध्ये गॅस एजन्सी मालकाचे संपूर्ण खर्च व घरपोच सेवेचा खर्च समाविष्ठ असतांनाही गॅस वितरक मात्र घरपोच डीलेव्हरीच्या नावाखाली ग्राहकांकडून १०० ते १५० रुपये अतिरिक्त दर आकारात असल्याचे दिसून येत आहे.

या बद्दलची अधिक माहिती घेतली असता, घरघुती वापराच्या प्रती सिलेंडरवर गॅस कंपनी मार्फत ३० रुपये डिलेव्हरी खर्च देण्यात आलेला असतो. असे असतांनाही गॅस एजन्सी वितरणाचे अतिरिक्त शुल्क आकारून ग्राहकाची लुट करत असून, तालुक्यात निर्धारित मूल्यापेक्षा घरपोच सेवेच्या नावाने अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या गॅस एजन्सीवर चौकशी करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत आहे.

      [ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजूर असल्याने गॅस वाहनाची वाट पाहणे शक्य होत नसते. त्यामुळे  रिकामा गॅस सिलेंडर नेमलेल्या पानटपरी व अन्य दुकानदाराकडे ठेवण्यात येत असतो. तेव्हा तो व्यावसायिक ग्राहकाकडून ३० ते ५० रुपयापर्यंतची वसुली केली जाते.]
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments