Monday, May 18, 2026
Homeवणीगाव विकास परिवर्तन पॅनलचा" सरपंच उमेदवार व सदस्यांना जनतेकडून उत्तम प्रतिसाद…….

गाव विकास परिवर्तन पॅनलचा” सरपंच उमेदवार व सदस्यांना जनतेकडून उत्तम प्रतिसाद…….

•”राकेशचा ” स्वच्छ प्रतिमेकडे मतदारांना विश्र्वास

• एक व्यावसायिक भोंग्यात म्हणतो की ,”चोरो को वोट मत दो “…..मग तुम्ही देखील रात्री काय करता हो? फिर इसमे बडा चोर कोण साहेब?अशीही गाव चर्चा रंगू लागली आहे.

विशेष प्रतिनिधी,वणी : ग्रा. पं सार्वत्रिक निवडणुकीसाठी थेट सरपंच पदासाठी कायर गावात रविवार 18 डिसे रोजी मतदान होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून गाव परिवर्तन पॅनल प्रचार करीत आहे. गाव विकास परिवर्तन पॅनेलमध्ये सरपंच उमेदवार तडफदार राकेश विठ्ल शंकावार असल्याने जनतेचा कौल गाव परिवर्तन पॅनलकडे असल्याचे बोलल्या जात आहे आणि विरोधक हे भिस्त झाल्याने वाटेल ते आरोप प्रत्यारोप करीत आहे. तीन पॅनल उभे असल्याने भिस्त विरोधक भोंग्यावर एकमेकांवर माईक घेउन खोटे आरोप करीत असल्याची चर्चा आहे. विशेष कायर गावात एक विरोधक व्यावसायिक भोंग्यात म्हणतो की ,”चोरो को वोट मत दो “मग तो कोणत्या विरोधकला म्हणाला हा व्यवसायिक आणि का ?परंतू साहेब तुम्ही देखील रात्री काय करता साहेब ? असाही गावकरी त्याला सवाल करीत असल्याचही खमंग चर्चा आहे..

राजकारणात म्हणतात ना की, पहले अपना घर देख …. फिर लोगो का….. ही एक सुप्रसिद्ध म्हण आहे.
आरोप प्रत्यारोप कितीही होत असले तरीही गाव विकास परिवर्तन पॅनेलमध्ये उमेदवारांना मतदार प्राध्यान्य देण्यात आले आहे. सर्वच उमेदवार हे डोअर टू डोअर प्रचार करीत असल्याने गाव विकास परिवर्तन पॅनलला नक्कीच यश मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि गाव विकास परिवर्तन पॅनलच विजयी होणार असल्याचे भाकीत केल्या जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page