Tuesday, February 17, 2026
HomeBreaking News"गवत्या" म्हणे यंदा....ग्रा.पं.पॅनल उभ करणार अन् पोटभरून राजकारण करणार...

“गवत्या” म्हणे यंदा….ग्रा.पं.पॅनल उभ करणार अन् पोटभरून राजकारण करणार…

•व्यवसाय क्षेत्रात "गोली मास्टर" अशी ओळख.

Desk :- एका गावात पुन्हा एकदा जुनाच चेहरा पण नव्या गर्वात दिसू लागला आहे — ‘गवत्या’नामक .ज्याने गावाच्या विश्वासावर आणि राजकारणाच्या नावाखाली अवैध पैसा कमावला, बेभाख उत्खननातून अफाट संपत्ती उभी केली, तोच आता येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतःचा पॅनल उभा करण्याच्या तयारीत आहे.या एका चर्चेने गावभर संताप उसळला असून, हा केवळ अहंकार नाही तर गावाच्या स्वाभिमानावर झालेला प्रहार असल्याची खमंग चर्चा रंगली आहे.

 

•‘गवत्या’ – गावातील एक नंबरचा ‘गोली मास्टर’….

स्थानिकांमध्ये ‘गवत्या’ हा एक नंबरचा ‘गोली मास्टर’ म्हणून ओळखला जातो. त्याचा चेहरा जरी साधा असला तरी व्यवहार मात्र मोठ्या मालकांशी! गरीबांचा साथीदार होण्याऐवजी तो नेहमीच पैशाच्या मक्तेदारीत रमला.गेल्या काही वर्षांत त्याने गावाच्या नावावर आणि राजकीय ओळखीचा वापर करून अमाप संपत्ती कमावली.त्याच्या उत्खननाच्या धंद्यामुळे गावची जमीन पोखरली, विहिरी कोरड्या पडल्या, आणि गावकऱ्यांच्या हाती आला केवळ धूर आणि धूळ. विकासाचा नव्हे, तर विध्वंसाचा ठेकदार म्हणूनच गावात त्याची ओळख तयार झाली आहे.

•राजकारणात विभागणी आणि पैशाचा मोह

‘गवत्या’ने गावात राजकारणाच्या नावाखाली फूट पाडली, काहींना पैशाच्या मोहात अडकवले, आणि आता पुन्हा ग्रामपंचायत आपल्या “मुठीत” घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण या वेळेस गावकऱ्यांनी मनोमन ठरवले आहे की “पोटभरून राजकारण करणाऱ्यांना गावातून हाकलून लावायचं.गावात अशी चर्चा जोरात आहे की, “गवत्या” सारखे स्वतःचं पोट भरणारे नव्हे, तर गावाचं भविष्य उभारणारे लोकच आता हवेत.जो गावात फूट पाडतो, तो गावाचा नाही; जो गावाच्या पोटावर हात ठेवतो, त्याला गावकऱ्यांनी धडा शिकवायलाच हवा. अशी बोंब ऐकावयास येत आहे.

•‘गवत्या’ची बोंब — “चुनकर लाऊंगा, बडा धंदा करूंगा!”

दरम्यान, गावात ‘गवत्या’च्या कथित विधानाची मोठी चर्चा आहे .ग्रामपंचायत सदस्य चुनकर लाऊंगा… और बडा धंदा करूंगा.

•”गवत्याची” खास एक बात…..

“गवत्याची” खास एक बात आहे की, जो कोणी गावात त्याला राजकारणामध्ये विरोध केला तर त्याला काही महिन्यानंतर तो जवळ घेतो, गाडी- घोडा घेण्यास मज्जाव करतो आणि शेवटी त्याला “आर्थिकदृष्ट्या” बेहाल, बरबाद करून सोडतो अशीही त्याचाबाबत गाव चर्चा जोमात सुरू आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments