Tuesday, July 15, 2025
Homeवणीखाकीतील माणूस! पोलीस सेवेतूनही P.I प्रदिप शिरस्करांची अशीही एक सेवा...!

खाकीतील माणूस! पोलीस सेवेतूनही P.I प्रदिप शिरस्करांची अशीही एक सेवा…!

अजय कंडेवार,वणी :- खाकी आणि खादी हीच आपल्या देशाची ओळख झाली. मात्र हे दोन्ही घटकांची इतकी भिती निर्माण झाले की लोक खाकी आणि खादीवाल्यांचा सर्वाधिक तिरस्कार करू लागले. त्यांना शिव्या घालू लागले. यांच्यातीलच काहींनी हे क्षेत्र पुरते बदनाम केले. असे असले तरी या क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक लोकानी या क्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. सगळंच काही संपलेलं नाही हा विश्वास निर्माण केला आणि चांगुलपणाच्या जोरावर सामान्य माणसाच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. खाकीतला माणूस जेव्हा सामान्य माणसाच्या भल्यासाठी अहोरात्र एक करतो तेव्हा व्यवस्थेवरचा, यंत्रणेवरचा विश्वास दृढ होतो. वर्दी अंगावर असतानाही एखादा माणूस सामान्य माणसात मिसळून काय करू शकतो हे पहायचे असेल तर वणी पोलीस स्टेशन P.I.प्रदिप शिरस्कर यांच्याकडे पहावे.The man in khaki! Such a service of P.I Pradip Shiraskar from police service…!

असाच एक प्रसंग वणी ठाण्यातच घडला………

नेहमीप्रमाणेच अनेक असे तक्रारकर्ते ठाण्यात येतात अन् निघून जातात.. अशीच एक तक्रार दि.21 .मार्च 2023 रोजी  एक तक्रारदार मुलगी सिया बानो रफिक उल्ला सयद ही हरविली म्हणून आई, वडील व मुलगा या सर्वांनी एकत्र येऊन तक्रार दिली. ते कुटुंब मध्यप्रदेश येथील कटनी या गावातील .अतिशय गरीब व हलाखीची परिस्थिती. डोळ्यात अश्रूचे धार. विशेष मजूरवर्ग त्यांना त्यांची मिळकतही त्यांचा मालकाने दिली नाही. महत्वाचे त्या मजुरांकडे मालकाचा भ्रणध्वनीक्रमांकही नाही. त्यांचे इतर सवंगडी, मूल उपाशी आहेत ते खदखद रडत असतांना खाकितली माणुसकी धाऊन आली. तो देव माणूस… वणी पोलीस स्टेशन पी. आय. प्रदिप शिरस्कर सदर कुटुंबाची आर्त हाक लक्षात घेत त्यांचा उपजीविकेकरीता अन्न धान्य वाटप करून मदत केली.त्यांची हरविलेल्या मुलीचा तात्काळ शोध घेऊन त्यांचे ताब्यात देण्याचे आश्वासनही दिले. त्यांना शासकीय वाहनामध्ये त्यांचा कामाचा ठिय्यावर पोहचून देखील दिले.The man in khaki! Such a service of P.I Pradip Shiraskar from police service…!
सल्यूट अश्या माणुसकीतील खाकीला……??

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments