Ajay Kandewar,वणी : शहरालगतच असलेला दगडी कोळशाचा मालधक्का (सायडिंग) वणीकरांना त्रस्त करून सोडत आहे. हा मालधक्का येथून हटविण्यासाठी वणीकर अनेक वर्षांपासून सतत मागणी करीत आहे. मात्र रेल्वे विभाग व वेकोली स्पष्ट याकडे दुर्लक्ष होत आहे. जणू काही रेल्वे व वेकोली प्रशासनाने वणीकरांच्या आरोग्याशी खेळच मांडल्याचें विदारक चित्रं दिसत आहे.
वणी कोळशाचा मालधक्का येथून लवकरच हटणार असल्याच्या वावड्या अनेक वर्षांपासून तोंडून उडविला जात आहे. मात्र याला अजूनही मूर्त रूप आले नाही.इंग्रजाच्या काळापासून वणीला रेल्वेस्थानक आहे. विभागातील दगडी कोळसा व चूना भट्ट्यांचे उत्पादन विक्रमी होते. त्यामुळे त्याची वाहतूक करण्यासाठी येथे इंग्रजांनी रेल्वे स्थानकाची निर्मिती केली. कालांतराने वणीला रेल्वेच्या जाळ्यात विणले.येथून तीन रेल्वेगाड्या सुरू केल्या. मात्र त्यापैकी केवळ नंदीग्राम एक्सप्रेसचाच थांबा येथे देण्यात आला. रेल्वेस्टेशनचे रूप पालटले. मात्र या परिसरात असणाऱ्या १० कोळसा खाणीतून निघणारा कोळसा विद्युत केंद्रांना पाठविण्यासाठी रेल्वे स्थानकावरच मालधक्का बनविण्यात आला.धूळ,ध्वनी प्रदूषणाचे भूत वणीकरांच्या मानगुटीवर बसले.ट्रकमधून कोळसा खाली टाकतात व तो रेल्वे वॅगनमध्ये भरताना कोळशाची धुळ हवेत उडतात. त्यामुळे रेल्वेस्टेशन परिसरातील घरे दररोज काळवंडतात. घराच्या छतावर व वाळायला टाकलेले कपडेसुद्धा दिवसभरात काळे पडतात,तर मग जनतेच्या हृदयात किती धुळ जात असेल, याचा अंदाज घेता येतो.तसेच जेसीबीने कोळसा उचलला जातो.त्या जेसीबीची घरघर रात्रंदिवस सुरू असते. या आवाजानेही जनता त्रस्त होत आहे.रेल्वे विभाग व वेकोली यांचे बेजबाबदारपणामुळे नागरिकांचे शारीरिक व आर्थिक नुकसान होणे हि बाब अतिशय गंभीर आहे.
वणी शहर परिसरात नगर पालिकेने AACOMS (हवा मापक यंत्र), फॉगिंग मशीनने रस्त्यावर पाणी फवारणी करून धूळ प्रदूषण उपाययोजना करावी विशेषतःआरोग्य विभाग, नगर परिषद वणी प्रशासनाने संयुक्तपणे नागरिकांची आरोग्य तपासणी, उपचार सुविधा व स्वच्छ हवा देणे गरजेचे आहे. रेल्वे विभाग जागेचे भाडे घेवून व वेकोली कंपनी खनिजचा व्यवसाय करून मालामाल आणि नागरिकांचे होते विनाकारण हाला-हाल हि बाब अतिशय गंभीर व अन्यायकारक आहे. आरोग्य विभाग, रेल्वे विभाग व प्रदूषण मंडळ व पोलीस विभाग प्रदुषणाने जस्त नागरिकांची संयुक्त बैठक घेवून उपाययोजना करावी व रेल्वे स्थानक येथील वेकोलीचा मालधक्का हटवून प्रदूषणाची गंभीर समस्या सोडवावी या उपरही कार्यवाही प्रदुषणाने त्रस्त नागरिकांना प्रदूषण मुक्त स्वच्छ हवा व न्याय मागणी करीता लोकशाही मागनि रस्त्यावर येण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी वणी उपविभागीय अधिकारी यांचा मार्फत यवतमाळ जिल्हाधिकारी,प्रादेशिक अधिकारी म.रा.प्र.नि मंडल चंद्रपूर, वणी न.पं.मुख्याधिकारी, वणी वैद्यकीय अधिकारी,ग्रामीण रुग्णालय,महाप्रबंधक वेकोली वणी नार्थ भालर वसाहत, वणी रेल प्रबंधक यांना निवेदनाचा प्रतीलीपी पाठवून करण्यात आली
•केंद्र व राज्य सरकार ने पर्यावरण प्रतिबंध कायदा…
” भारतीय संविधान अनुच्छेद २१ नुसार प्रदूषण विरहित वातावरणात चास घेण्याचा मुलभूत अधिकार नागरिकांना आहे. परंतु या मुलभूत अधिकाराची वेकोली व रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक पायमल्ली करत आहे. रेल्वे सायडिंगच्या धूळ प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य व पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याकरिता केंद्र व राज्य सरकार ने पर्यावरण प्रतिबंध कायद्यांतर्गत जल वायू याची उपाययोजना होण्याच्या दृष्टीने प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी अटी शर्ती घालून दिल्या आहे. त्या ठिकाणी सिमेंट रोड, निरंतर तुषार संच, बाबू, करंज, कडूनिंब वृक्ष लागवड नाही, धूळरोधक सुरक्षा भिंत याची आवश्यकता आहे. परंतु नियम व कायद्यानुसार अंमलबजावणी वेकोली व रेल्वे विभाग कडून होत नाही. निरंतर धूळ प्रदषणामुळे हवेचा दर्जा पसरला नागरिकांना स्वच्छ हवा मिळत नाही. प्रदुषित हवेमुळे रेल्वे स्थानकावरील प्रवासी, रहिवासी नागरिक, उपहार गृहातील खाद्य पदार्थ, उद्यान व घरगुती झाडे, परिसरातील छोटे व्यावसाविकांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम तसेच चिडचिडपणा इत्यादी दुष्परिणाम सर्वत्र दिसून येत आहे.”