Friday, July 11, 2025
Homeवणीकोई कितना भी कर ले खोट...."जय सहकार" को ही मिलेंगे वोट......!!!!

कोई कितना भी कर ले खोट….”जय सहकार” को ही मिलेंगे वोट……!!!!

•काँग्रेस ,भाजपा यांचा दुफळीने: “जय सहकाराला” मिळाले बळ

•वसंत जीनिंगच्या निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र

अजय कंडेवार,वणी – वसंत जीनिंगच्या निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार दिले आहेत. काँग्रेसच्या व भाजपच्या अंतर्गत धुस्फुसिमुळे येथे वसंतचे माजी अध्यक्ष ऍड देविदास काळे यांनी आपल्या जय सहकार पॅनेल विजयी संधी आहे. त्यामुळे येथील निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे.

वसंत जीनिंगच्या निवडणुकीत सहकार क्षेत्राचे महर्षी वसंतचे माजी अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांचे जय सहकार पॅनल, काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वामनराव कासावार यांचे परिवर्तन पॅनल तर भाजपचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांचे शेतकरी एकता परिवर्तन पॅनल अशी येथे तिरंगी लढत होत आहे. यामध्ये काँग्रेस आणि भाजपापेक्षा ऍड देविदास काळे यांचे “जय सहकार ” पॅनल सक्षम असल्याने मताचे विभाजन होऊन याचा फायदा ऍड देविदास काळे यांच्या “जय सहकार ” पॅनलला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जय सहकार पॅनलचे नेतृत्व ऍड देविदास काळे यांचेकडून विजयाची दावेदारी केली जात आहे.कारण यापूर्वी रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळविल्यामुळे मतदारांचा कल ऍड देविदास काळे यांचे जय सहकार पॅनलकडे असल्याचे जनसामान्यांत चर्चा असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. परंतु 6 नोव्हेंबर ला वसंतच्या 10 हजार 924 मतदारांचा कौल मिळवणारच वसंतवर राज करणार आहे. परंतु येथील तिरंगी लढतीने विधानसभेचे लक्ष वेधले आहे यावेळची निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे.त्यामुळे जय सहकार पॅनलचे उमेदवार विजय चोरडिया, राजाभाऊ पाठरडकर, प्रशांत गोहोकार, प्रेमकुमार खुराणा, विलास मांडवकर, पवन एकरे, अमोल ठाकरे, मोहन जोगी, लुकेश्वर बोबडे, संजय पारखी ,पुंडलिक भोंगळे, सुरेश बरडे, सुनील वरारकर, वंदना भोंगळे, मंदा पाचभाई, नामदेव सुरपाम, मेहनत घेत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments