Ajay Kandewar -Wani assembly poll :- विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज सोमवार शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नेत्यांच्या शिष्टाईला यश येणार का? हे आज स्पष्ट होणार आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत थेट लढती ठरणार आहेत. कुणबी फॅक्टरचा ” एक्का ” समजले जाणारे संजय खाडे अर्ज मागे घेणार का याकडे वणी विधानसभेचा जनतेचे लक्ष आहे.
वणी विधानसभा काँग्रेसच्या बालेकिल्ला असूनही महाविकास आघाडीत काँग्रेसला उमेदवारी न मिळाल्याने स्थानिक नेते नाराज झाले. तसेच अल्प काळात जनतेचा मनात जागा बनविणारे काँग्रेसचें संजय खाडे यांनी जनतेचा सेवेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारांची समजूत काढण्यासाठी स्थानिक नेते प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांनी केलेली जनतेसाठी बंडखोरांची नाराजी अद्याप दूर झालेली नाही.जिल्ह्यात वणी, उमरखेड, पुसद व यवतमाळ विधानसभा मतदारसंघात नाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. यात सर्वाधिक चर्चा झाली ती वणी येथील संजय खाडे कुटुंबातील बंडखोरीची. वणी येथे महाविकास आघाडीचा मित्र पक्षाला शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे संजय खाडे यांनी 1 अपक्ष उमेदवारी अर्ज व एक काँग्रेस पक्षाचा नावाची अर्ज दाखल करून महायुतीचे उमेदवार संजिवरेड्डी बोदकुरवार व संजय देरकर यांच्यासमोर आव्हान निर्माण केले. कुणबी समाज व इतर ग्रामीण भागात संजय खाडे यांचा “एक्का “चालणारच यात काहीं शंका नाहीं परंतु त्यांचे अर्ज घेण्यासाठी अनेक स्थानीक नेते वरीष्ठ नेते लोणी लावत असल्याचं सध्याचं चित्र दिसत आहे. परंतु संजय खाडे यांनी जर अर्ज मागे घेतला तर सामान्य जनतेच्या मनातील आमदार जनतेला मिळणारं का? याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
खाडे यांनी माघार घेतल्यास येथे महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत होईल. वणीमध्ये बहुजन ,आदिवासी, कुणबी, अल्पसंख्याक ही मते अधिक आहेत. महाविकास आघाडीने येथे कुणबी कार्ड चालविले. त्यामुळे कुणबी अशी जातीय समिकरणावर येथील निवडणूक जाण्याची शक्यता आहे. येथे मनसे, वंचित, बसपाचे उमेदवारही निवडणूक लढवित आहेत. मात्र यातील “मनसे शिवाय “कोणीही उमेदवार प्रभावी नसल्याने यावेळी कुणबी समाजाच्या मतांसोबतच मुस्लीम, दलित, ओबीसी मते मिळण्याची आशा महाविकास आघाडीला आहे.