•जो खुद के घर का ही नहीं…. वो जनता का कैसे? अशी ही एक चर्चा….
•गावचा विकास कोण करणार? दुसऱ्यांचा भरवश्यावर राहणारा?की स्वबळावर असणारा.
अजय कंडेवार,वणी:- गावाचं सरपंचपदावर विराजमान होण्याची इच्छा मनी असलेल्या अनेकांनी आपापल्या गावात मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र या आनंदावर राज्य सरकारनी ग्रामपंचायतीची निवडणूक आरक्षणही जाहिर केले. त्यामुळे आता गावातील पॅनलचा खर्च कुणी करायचा असा प्रश्न गावपुढारी व पॅनल प्रमुखावर आले आहे. (Gram Panchayat election Panal)
गावागावात सरपंचपदावर डोळा ठेवून पॅनल प्रमुखांकडून किंवा सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींना, निवडणूक रिंगणात उतरवले आहे. स्वतःबरोबर या उमेदवाराचा खर्च संबंधित पॅनल प्रमुख उचलत असताना
काहीं पॅनल प्रमूख वणीत येऊन वेग वेगळ्या पुढार्यांकडे खर्चाची मदतीचा हात मागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष गावात असेही बोलल्या जात आहे की शर्यती देखील सूरु झाले आहे. गाव विकास गेला पाण्यात किसमे कितना है दम ….. अशीच निवडणूक गावात दिसून येत आहे तेही पक्षाचा भरवश्यावर पॅनल प्रमूख उड्या मारीत असल्याचे दिसून येत आहे. परंतू ही निवडणूक स्वबलावर असणारी गाव निवडणूक आहे. परंतु यातही काहीं पॅनल प्रमूख दारो दारी भटकंती करीत असल्याची गाव चर्चा आहे.आता यांचे भविष्य मतदार राजाचा हाती आहे.चला पाहूया समोर…..
ऐन निवडणुकीच्यावेळी काहींनी पक्षच बदलले आहे. यावरून त्यांची काय लायकी हेही मतदार राजाला कळले आहे.आणखी काहीच असेही म्हणणे आहे की,•जो खुद के घर का ही नहीं…. वो जनता का कैसे? अशी गावात खमंग चर्चा सुरू झाली आहे.