कायर गावात ‘ ते ‘ रेती चोरटेच ” म्हणताहेत मेरा सरपंच तो मेरा ट्रॅक्टर चलेगा….”
•आज रात्री ‘ते रेती ‘चोरटे दारूचा व पैश्याचा महापुर करण्याचा तयारीत का?…..
•शिरपूर हद्दीततील पोलिसांचा बंदोबस्ताची गरज अन्यथा कोणताही अनुचितप्रकार घडण्याची शक्यता अटळ…
•’तो ‘ पाठिंबा नाहीं म्हणणारा ठेकेदारांकडून ‘ मदत ‘वाटण्यासाठी आणले काय? अशी गावचर्चा….
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील कायर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्षाचे गावविकास परिवर्तन पॅनलचे सरपंचपदासाठी राकेश विठ्ठल शंकावार हे छत्री चिन्हावर प्रभावशाली उमेदवार असल्याने निवडणुक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. वणी तालुक्यातील कायर ग्रामपंचायत ही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सध्या शिवसेनेच्या उमेदवारांचा बोलबाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार शिवसेनेचाच विजय पताका फडकवणार असा अंदाज आहे.कायर ग्रामपंचायतीमध्ये तीन मतदान केंद्र आहे पहिल्या मतदार केंद्रात 742 मतदार, दुसऱ्या केंद्रात 599 मतदार तर तिसऱ्या केंद्रात 614 मतदार आहे असे एकूण 1955 मतदार मतदानाचा हक्क बजावणार यामध्ये 990 पुरुष मतदार तर 965 स्त्री मतदार आहे.
यातच आजची रात्र ‘ ते रेती चोरटे ‘ दारूचा व पैश्याचा महापुर करण्याचा तयारीत असल्याची विश्वसनीय माहीती समोर आली आहे.त्याकरिता शिरपूर हद्दीततील पोलिसांचा कायर गावात प्रत्येक वॉर्डांत बंदोबस्ताची गरज अन्यथा कोणताही अनुचितप्रकार घडण्याची शक्यता अटळ आहे. काल दिनांक 16 डिसेंबरला एक पॅनल उमेदवाराने 10 उमेदवारासोबत घरी घरी जाऊन रात्रभर एक फतवा (पॉम्पलेट ) वाटल्याचे गावकरी बोलत आहे. ही राजकीय खेळी करून मतदार राजाला विकत घेणार का? अशी खमंग चर्चा आहे.विशेष आणखी एक महत्वपूर्ण माहिती समोर आली की, ‘तो ‘ मला कुणाचा पाठिंबा नाहीं म्हणणारा आणि मतदारांना नव-नवीन फंडे देणारा ठेकेदारांकडून ‘ मदत ‘वाटण्यासाठी आणले काय? अशी गावचर्चा सूरु झाली आहे.