Monday, October 26, 2026
HomeCityकायरचे सरपंच नागेश घनकसार यांचा ‘लोकमत यवतमाळ गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मान

कायरचे सरपंच नागेश घनकसार यांचा ‘लोकमत यवतमाळ गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मान

 

वणी:- तालुक्यातील कायर ग्रामपंचायतीचे सरपंच नागेश भाऊ घनकसार यांना ‘लोकमत यवतमाळ गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. लोकमत समूहाच्या वतीने आयोजित या गौरव सोहळ्यात जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते नागेश घनकसार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील नेतृत्व, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेले कार्य आणि सामाजिक योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आल्याने कायर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

यवतमाळ येथे रविवार, २५ ऑक्टोबर रोजी आयोजित या सोहळ्याला आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री अशोक उईके, आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page