Saturday, November 21, 2026
HomeKayarकायरकरांचा एल्गार... डोलोमाईटच्या जड वाहतुकीविरोधात आता थेट ‘रास्ता रोको’चा इशारा....

कायरकरांचा एल्गार… डोलोमाईटच्या जड वाहतुकीविरोधात आता थेट ‘रास्ता रोको’चा इशारा….

Ajay,Wani : तालुक्यातील कायर गावातून कंपनीमार्फत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या डोलोमाईटच्या जड वाहतुकीविरोधात आता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून धुळीच्या प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महिला, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यापूर्वी वारंवार लेखी निवेदने देऊनही कंपनी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने कायर ग्रामपंचायत सरपंच नागेश घनकसार यांच्या नेतृत्वात आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. डोलोमाईटची जड वाहतूक तात्काळ बंद करा, अन्यथा रास्ता रोकोला सामोरे जा! असा थेट इशारा कंपनी प्रशासनाला देण्यात आला आहे.

दिलेल्या निवेदनानुसार, येत्या ३० नोव्हेंबर २०२६ रोजी वणी-मुकुटबन मार्गावरील कायर बसस्थानकाजवळ शांततापूर्ण रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे, वाहतुकीसंदर्भातील सर्व शासकीय परवानग्या व ना-हरकत प्रमाणपत्रांची तपासणी करणे, खराब झालेल्या रस्त्यांची कंपनीच्या खर्चातून तातडीने दुरुस्ती, CSR निधीतून गावविकासासाठी तरतूद तसेच धूळ नियंत्रण व पाणी फवारणीसह पर्यावरण संरक्षणाच्या उपाययोजना करण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मागण्यांवर कंपनी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी गावातील युवकवर्ग उपस्थित होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page