•दिग्गजांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
अजय कंडेवार, वणी :- मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विजेचे भारनियमन बंद करणे तसेच शेतीसाठी 24 तास वीज मिळावी या तसेच नवीन कृषिचे पंपाचे कनेक्शन त्वरित जोडणी करून देण्यात यावे अशा विविध मागण्या पूर्ण करून जनतेला न्याय मिळावा याकरिता माजी आमदार वामनराव कासावार यांचे मार्गदर्शनात मारेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने ता.23 ऑक्टो.पासून आमरण उपोषण मार्डी चौकातील पोलीस वेलफेअर पेट्रोलपंपासमोर सुरू असलेल्या उपोषणाचा कालचा तिसरा दिवस होता.तिसऱ्या दिवशी 25 ऑक्टोबर रोजी सकारात्मक चर्चेनंतर तसेच लेखी आश्वासनानंतर उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले.
उपोषणात टिपलेला एक क्षण…..
लोडशेडींगचा शॉक सर्व सामान्य ग्राहकांना बसला आहे.त्यामुळे समस्या सोडविण्यासाठी तालुका कांग्रेसने आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते.ता 23आक्टोबर पासून सुरु झालेल्या अनोदलनाचा 25आक्टोबर सायंकाळ 6 वाजे पर्यंत उपोषण सुरूच होते आपल्या मागणीवर उपोषण कर्ते ठाम असल्यामुळे प्रशासनाने सकारात्मक चर्चेची तयारी दर्शविली होती. आंदोलनकर्त्याची मागणी न्यायिक असल्यामुळे संबंधित विभागा कडून लेखी आश्वासन लिहून दिले त्यामुळे हे उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले. उपोषण कर्त्यांच्या मागणीला वरिष्टानी चर्चेची तयारी दर्शविली दोनदा चर्चेतून समाधान झाले नव्हते त्यामुळे हे आंदोलनात तीव्र होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
अखेर वरिष्ठ पातळीवर चर्चा घडविल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत उपोषणाची सांगता करण्यात आली. कार्यकारी अभियंता नरेंद्र कटरे, मुख्य अभयंता खंगार, उपभियंता पाटील यांचे सोबत माजी आ. वामनराव कासावार कांग्रेसचे जेष्ठ नेते नरेंद्र पा. ठाकरे,डॉ. महेंद्र लोढा, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अफसर शेख, वणी तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, झरी तालुका अध्यक्ष आशिष कूलसंगे, कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे यांनी विविध समस्याना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी सकारात्मक चर्चा केली या मध्ये उपोषण कर्त्यांचे समाधान झाले असून लेखी आश्वासना नुसार अमलाबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा देत हे आंदोलन तूर्तास स्थागित करण्यात आले.