•महिलेला विसरलेली बॅग केली परत,
•ठाणेदारांनी केला सत्कार….
अजय कंडेवार, वणी :- प्रामाणिकपणा हा विषय बोलायला जितका सोपा, आचरणात आणायला तितकाच अवघड. त्यामुळे आजच्या युगात प्रामाणिक आणि ‘इमानदार’ व्यक्तींचे प्रमाण विरळच. त्यातही विषय पैशाचा असेल, आणि आपसूकच तुमच्या खात्यावर हजारोंची रक्कम जमा झाली असेल तर? त्यावेळी प्रामाणिकपणे वागणे आणि इतके मोठे घबाड परत करणे तर केवळ अशक्यच. मात्र समाजात अजूनही असे लोक शिल्लक आहेत ज्यांच्याकडे पाहिलं की माणुसकी, प्रामाणिकपणा, सचोटी आणि धर्मपरायणता या गुणांवर असणारा आपला विश्वास आणखी दृढ होतो. असाच एक राजूर गावातील ऑटो चालक “अफसर खान” त्याचा प्रामाणिकतेमुळे सध्या वणी ठाण्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
दि.18 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजताचा सुमारास राजूर येथील ऑटो रिक्षा चालक अफसर खान हकीम खान या तरुणाचे स्वतःचा मालकीचे एक ऑटो आहे . तो राजूर- वणी या मार्गे प्रवाश्यांना ने आण करीत असायचा. नेहमी प्रमाणे अफसर ऑटो घेऊन प्रवाश्याना घेऊन तो प्रवाश्यांना सोडले.परंतू दि.17 ऑक्टोबर 2023 रोजी त्या प्रवास करणाऱ्या महीला प्रवाशाची “पर्स ” चुकून राहिलेली आहे असे चालकाचा लक्षात आले असता त्याने दि.17 ऑक्टोबर रोजी थेट “ती पर्स ” घेऊन अफसरने वणी पोलिस स्टेशन गाठले असता त्याने स्पष्टरित्या ठाण्यात माहिती दिली की, ती महिला प्रवासी कोण आहे याबद्दल मला काहीच माहीत नाही तरी ही पर्स “त्या-महिला” प्रवाशाला ती परत देण्यामध्ये सहकार्य करावे अशी विनंतीही ऑटो चालकाने केली.त्याच दिवशी दि.17 ऑक्टोंबर रोजीच ती महीला सैरा वैरा होत वणी शहरात “त्या ऑटोचा” शोध घेत होती ज्या ऑटोमध्ये तीने प्रवास केलेला होता.
ती महीला थकून थकून तीनेही वणी पोलिस स्टेशन गाठली व रितसर पर्स हरविल्याची तक्रार 17 ऑक्टोबर रोजीच देण्यासाठी आली.त्या महिलेचे नाव दुर्गा जितेंद्र पोयाम हे होतें. परंतू त्याआधीच” अफरसर नामक ऑटो चालकाने “त्या पर्सबद्दल माहिती ठाणेदार अजित जाधव यांना कळविलेच होतें. म्हणून त्या महिलेची तक्रार घेतांना पर्सबद्दल माहिती पोलिसांनी विचारले की,पर्समध्ये काय किमती वस्तू होत्या? याबद्दल विचारणा केली व पर्सचे वर्णन विचारले असता त्या महिलेने पर्सचे वर्णन व त्यामध्ये असणारी रोख 3500 रू तसेच चांदीचे पैजण असल्याचेही स्पष्ट पुरावे सहित सांगितले. त्यावरून ऑटो चालक यांनी आणून दिलेली “ती पर्स” ही त्या महिलेचीच असल्याचे खात्री झाल्याने रिक्षा चालक अफसर खान यास बोलावून अफसर च्याच हस्ते दुर्गा जितेंद्र पोयाम यांना त्यांची ऑटोमध्ये राहिलेली पर्स त्यामधील रोख रक्कम व चांदीच्या दागिन्यासह परत केली केली.
अश्या या अॉटो चालक अफसर खान यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल वणी पोलिस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अजित जाधव त्यांच्या स्टाफने पुष्प देऊन कौतुक करीत “ऑटो चालक”ची पाठ थोपटली तसेच जितेंद्र पोयाम यांनी अफसर खान या ऑटो चालकाचा प्रामाणिकपणाबद्दल स्वखुशीने रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले.